जाणून घ्या नीता ट्रॅव्हल्स कोणाची, नीता अंबानी की राज ठाकरे…

भारतातील नीता टूर्स आणि ट्रॅव्हल्स ही कंपनी आपल्या सेवेमुळे संपूर्ण देशभरात ओळखली जाते.परंतु या कंपनीच्या नावविषयी काही लोकांच्या मनात संभ्रम झालेला आपल्याला पाहायला मिळतो.काही जणांना वाटते की या टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपनीची मालकीण नीता अंबानी आहे. तर ,काहींनी याचा संबंद्ध थेट राज ठाकरे यांच्याशी जोडला आहे. तर नेमकी ही नीता टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपनी आहे तरी कुणाची?

चला तर पाहुयात कोणाची आहे नीता टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपनी. नीता टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपनी ही नाही नीता अंबानीची नाही राज ठाकरेंची. ही कंपनी आहे सुनील सावला यांची सन 2000 साली सुनील यांनी ही कंपनी चालू केली होती. त्यानंतर महाराष्ट्र, गुजरात,गोवा,राजस्थान मध्यप्रदेश,आंध्रप्रदेश, इत्यादी राज्यांमध्ये ही नीता टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपनी ओळखली जाते. नीता टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपनीचे मुख्य कार्यालय पुणे तसेच मुंबई येथे सुद्धा आहे. या कंपनी मध्ये अशोक लेलँड, Mercedes-Benz, टाटा या मोठ्या कंपनीच्या 250 हुन अधिक गाड्या कार्यरत आहेत.

आजकालच्या या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आणि ग्राहकांना चांगल्या सुखसुविदा पुरवण्यासाठी या कंपनीचे नाव आदराने घेतले जाते. नीता टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपनीचे वार्षिक उत्पन्न हे 31 करोड पेक्ष्या ज्यास्त असल्याचे बोलले जात आहे. मित्रांनो आम्ही अशा करतो की आम्ही दिलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये लिहून सांगा……!!

Leave a Reply

Your email address will not be published.