सिद्धी खैरियत – भूमिका साकारणारा अभिनेता कोण आहे..? जाणून घ्या….

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या Mahiti.in या वेबसाईट वरती, तुम्हाला हा प्रश्न तर नक्कीच पडला असेल की zee marathi वाहिणीवर सुरू असणारी स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका सध्या महाराष्ट्रातील लोकांच्या घरा घरात पोहोचली आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अप्रतिम भूमिकेमुळे हे कलाकार नेमके आहेत तरी कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता सध्या सर्वांनाच लागली आहे. ह्या मालिकेतील जंजिऱ्यावरील सिद्धीची खैरीयत ची भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे हा अभिनेता नक्की कोण आहे….?

आज आम्ही तुम्हाला इथे त्या अभिनेत्या विषयी सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात की तो अभिनेता नक्की कोण आहे. मित्रांनो ही भूमिका साकारणार अभिनेता आहे विश्र्वजित फडते ……!! यांचे मूळ गाव गोव्यामधील मडकई हे आहे. सध्या ते गोव्यातील फोंडा या ठिकाणी राहतात. अभिनयाची विलक्षण आवड असणाऱ्या विश्र्वजित यांनी थेटर्स, टीव्ही मालिका, आणि चित्रपटामध्ये देखील वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी “गड्या आपला गाव बरा” या मराठी चित्रपटात देखील भूमिका साकारली आहे. सोबतच त्यांनी “आपला राजा जाणता राजा” या नाटकामध्ये देखील अफजल खान याची भूमिका साकारली आहे. त्याच सोबत त्यांनी एका नाटकामध्ये कंस मामाची भूमिका साकारली आहे.

विश्र्वजित फडते यांना महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र नाट्य मोहोत्सवात, प्राथमिक नाट्य स्पर्धेमध्ये एका नाटकामध्ये अप्रतिम अभिनयासाठी रौप्य पदक देखील मिळाले आहे. मध्यंतरी प्रचंड लिकप्रिय झालेल्या जय मल्हार या मालिकेमध्ये देखील त्यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या विश्र्वजित फडते यांचे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील क्रूर अशी नाकारत्मक भूमिका सध्या सर्वांनाच पाहताना नकोशी वाटती आहे. पण एक अभिनेता म्हणून आणि एक कलाकार म्हणून ती भूमिका अतिशय चोक पणे आणि अतिशय दर्जेदार अभिनयातून त्यांनी साकारलेली दिसून येते.
मित्रांनो ही माहिती तुम्हाला काशी वाटली ते कमेंट मध्ये लिहून आम्हाला नक्की सांगा.

One Comment on “सिद्धी खैरियत – भूमिका साकारणारा अभिनेता कोण आहे..? जाणून घ्या….”

  1. सिद्धी खैरियत चा रोल खूप खूप जबरदस्त केला आहे त्यामुळे त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील खलनायकाची भूमिका त्यांना मिळायला हवी असे मला वाटते खरचं जबरदस्त जंजिरा किसीका उधार नहीं रखता चुकता करता हैं

Leave a Reply

Your email address will not be published.