तृतीयपंथी लोकांचे अंतविधी कसे होतात ? ते सर्वसामान्य लोकांना का पाहू देत नाहीत…

तृतीयपंथी म्हटले की टोलनाक्या पासून रेल्वे पर्यंत टाळ्या वाजवत मोठ्या आवाजात ओरडत कोणाला शिव्या तर कोणाला आशीर्वाद देत पैसे मागणारे लोक डोळ्यासमोर तरंगतात. पूर्वी प्रत्येक शुभ प्रसंगी म्हणजे लग्न हळदी मध्ये आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून तृतीयपंथीना बोलावले जायचे. आजकाल याच प्रमाण कमी होऊ लागले आहे. पण छोट्या शहरामध्ये आणि गावांमध्ये अजूनही तृतीयपंथी लोकांच्या आशीर्वादाचा स्थान आहे.

तृतीयपंथी काळानुसार हळू हळू सामान्य लोकांमध्ये मिसळू लागले आहेत.शिकत आहेत, कामधंदे करत आहेत. तरीही त्यांचं एक वेगळं विश्व आहे. त्यांच्या रुडी परंपरा सर्वसामान्य लोकांपेक्ष्या वेगळ्या आहेत….त्यातीलच एक आहे तृतीयपंथीचा अंत्यविधी….तुम्ही अजून पर्यंत कधीही तृतीयपंथी लोकांची अंत्ययात्रा पाहिली नसेल.कारण त्यांचे अंत्यविधी मध्यरात्री एका वैशिष्ट्य पद्धतीने केले जाते. कसे केले जातात त्यांचे अंत्यविधी आणि सर्व सामान्य लोकांनी ते पाहिले तर त्यांच्यासोबत काय केलं जातं? चला जाणून घेऊया..अशी मान्यता आहे की बऱ्याच तृतीयपंथीकडे ध्यानवीक शक्ती असते. त्यामुळे मृत्यू च्या पूर्वीच त्यांना मृत्यूची जाणीव झालेली असते. मृत्यू येणार हे कळल्यानंतर तृतीयपंथी लोक बाहेर न फिरत घरात बसून राहतात. अन्न त्याग करून फक्त पाणी पिऊन देवासमोर आपल्यासाठी व इतर समुदाय साठी प्रार्थना करतात. की पुढील जन्म आम्हाला तृतीयपंथी मिळू नये. जवळपास राहणारे तृतीयपंथी काहीच दिवस शिलक असणाऱ्या तृतीयपंथी लोकांना भेटायला येतात.

अशी मान्यता आहे की त्या तृतीयपंथी ने दिलेल्या आशीर्वाद खूप लाभदायक असतात. तृतीयपंथी लोकांची मृत्यु ची गौष्ट इतर सामान्य माणसाला कळणार नाही याची ते काळजी घेतात. अगदी जिथे पार्थिव जमिनीत पुरायचे असते, तेथील अधिकाऱ्यांना सुद्धा ही माहिती गुप्त ठेवण्यास सांगितले जाते. मृत्यू पच्यात अंत्ययात्रे पूर्वी मृत शरीराला इतर तृतीयपंथी चपला बुटांनी मारतात, शिव्या देतात, कारण जर मृत्यु तृतीयपंथी ने आयुष्यात काही अपराध केले असतील म्हणून प्रायश्चित म्हणून पुढील जन्म त्याला सामान्य मिळावा. अंत्ययात्रेत मृत्यू तृतीयपंथी ला चार खांद्यावरून घेऊन जात नाहीत, तर त्यांच्या परंपरेनुसार शव उभे करून नेले जाते. ही अंत्य यात्रा मध्य रात्री नंतर असते. त्यांचे शव जाळण्याऐवजी पांढऱ्या कपड्यात गुंडाळून जमिनीत पुरले जाते. त्याआधी त्यांच्या तोंडात एखाद्या पवित्र नदीचे पाणी देऊन विधि आटपून नंतर शव जमिनीत पुरले जाते.

तृतीयपंथी समुदायाची अशी मान्यता आहे की,त्यांचे अंत्य विधी सर्वसामान्य लोकांनी पाहू नयेत. जर यदा कदाचित जर कोणी पाहिले तर मृत्य तृतीयपंथी ला पुढील जन्म तृतीयपंथी म्हणूनच मिळतो. तृतीयपंथी आयुष्यात खूप अडचणींना सामोरे जातात. आयुष्यात दररोज काही त्यांना वाईट सोसावे लागते. त्यांना स्वतः तृतीयपंथी असण्याचा खूप तिकार असतो. त्यांची मनोमन हीच इच्या असते की मला पुढचा जन्म तर तृतीयपंथी मिळू नये. सर्वसामान्य लोकानी जर त्यांची अंत्य यात्रा पाहिली तर त्यांच्या भावना दुखावल्या जातात. अंत्ययात्रे नंतर वयोवृध्द लोक साथ दिवस उपास करतात.आणि मग तृतीयपंथी च्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करतात. तुमच्याकडे तृतीयपंथी लोकांची माहिती असेल तर कंमेंट मध्ये देऊ शकता. इतरांसाठी ते अधिक माहिती पूर्ण असू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published.