अग्गंबाई सासूबाई मालिकेतील मॅडी आहे या प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी…

मित्रानो झी मराठी वर नुकतीच सुरू झालेली मालीका ‘अगबाई सासूबाई’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान, निवेदिता सराफ, आणि अभिनेता गिरीश ओक हे दिगज कलाकार असलेल्या मालिकेत काही नवीन सुद्धा कलाकार आहेत. अभिजित ओक हे या मालिकेत चिफ अभिजित राजे ही भूमिका साखारत आहेत. पण आज आपण माहिती पाहणार आहोत, चीफ अभिजित राजे यांच्या हॉटेल मध्ये म्याडी ची भूमिका साखारणाऱ्या अभिनेत्री विषयी.

जर तुम्ही कॉमेडीची बुलेट ट्रेन हा शो पाहिला असेल, तर म्याडी ची भूमिका साखारणाऱ्या या अभिनेत्रीला तुम्ही नक्कीच ओळखलं असेल. तर या अभिनेत्रीचे नाव आहे ”भक्ती रत्नपारखी” ह्या निखिल रत्नपारखी यांच्या पत्नी आहेत. अभिनेता निखिल रत्नपारखी यांनी आतापर्यंत अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटा मध्ये हास्य कलाकाराची भूमिका साखारली आहे. तर मित्रानो अभिनेता निखिल रत्नपारखी यांची पत्नी भक्ती रत्नपारखी यांनी या आधी काही मालिकांमध्ये सुद्धा काम केले आहे. पण आता यांनी साखरलेली म्याडी ची भूमिका सर्वांना आवडू लागली आहे.

अभिनेत्री भक्ती रत्नपारखी यांनी अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या विषयी एक पोस्ट केली आहे,” “यात त्यांनी म्हंटले आहे की मी लहान पणापासूनच निवेदिता सराफ यांचे काम पाहत आले आहे.

आताच त्यांचं वाडा या नाटकातल अप्रतिम काम मला मनापासून आवडलं.तेव्हा मला यांच्या बरोबर काम करायला मिळेल असे वाटलेच नव्हते…अगबाई सासूबाई च्या ऑडिशन ला जेव्हा मी गेले…आणि तेव्हा निवेदिता मॅम ने तूच हे म्याडी कॅरेक्टर करणार आणि खूप छान करणार अस सांगितलं.आणि माझा कॉन्फिडन्स वाढला. त्याबद्धल मी काय बोलू…त्यांच्या विषयी आदर खूपच वाढला.आणि ती कधी माझी निवेदिता आई झाली कळालेच नाही..आणि खूप काही आहे सांगण्याबद्धल…सांगेन हळूहळू..love you tai””तर अशी पोस्ट तिने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.