नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे Mahiti.in ह्या वेबसाईटवर, आम्ही आज तुम्हाला जगातील काही अश्या देशांबद्दल माहिती देणार आहोत. जिथे सूर्य कधीच मावळत नाही , जिथे रात्री होतच नाही…..!! चला तर मग ह्या विषयी आपण आणखी अधिक माहिती जाणून घेऊ. तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की दिवसा नंतर रात्र येते आणि रात्रीच्या अंधारानंतर पहाटेचा सुंदर असा प्रकाश येतो. हे सर्वांनच्या साठी काही नवीन नाही.
परंतु जगात असे काही देश आहेत जेथे सूर्य कधीच मावळत नाही. आपण विचार करत असाल की असे कसे होऊ शकते की, सूर्य कधीच मावळत नाही.? आज आम्ही तुम्हाला त्या देशांबद्दल सांगणार आहोत जिथे सूर्य कधीच मावळत नाही किंवा असे देखील म्हणता येईल की तिथे कधीच रात्र होत नाही.
१) फ़िनलैंड: फ़िनलैंड हा देश बेटांनी आणि अनेक सरोवरांनी वेढला आणि सजला आहे. तुम्हाला सांगूं इच्छितो की फ़िनलैंड हा असा देश आहे, जिथे बर्याच भागात उन्हाळ्यामध्ये सुमारे 73 दिवस सूर्य मावळत नाही. २) आइसलैंड: हे ब्रिटननंतर युरोपमधील दुसरे सर्वात मोठे बेट आहे, आइसलैंड हा असा देश आहे जेथे सूर्य मे ते जुलै पर्यंत कधीही मावळत नाही. इतकेच नव्हे तर इथे मध्यरात्री देखील दिवसा पडणाऱ्या प्रकाशचा आनंद घेता येतो.

३) नॉर्वे: नॉर्वे आर्क्टिक सर्कलशी संबंधित आहे. नॉर्वे हा असा देश आहे जेथे मे ते जुलै दरम्यान सुमारे 76 दिवस सूर्य कधीच मावळत नाही. याच कारणामुळे नॉर्वेला ‘लँड ऑफ द मिडनाइट सन’ असेही म्हणतात. ४) स्वीडन: हा एकदम शांत आणि सुंदर देश. ह्या देशमधील वतावरण खूप थंड आहे, तरी देखील इथेवसुमारे 100 दिवस सूर्य मावळत नाही. स्वीडनमध्ये मे ते ऑगस्टपर्यंत सूर्य अजिबात मावळत नाही. आणि त्यानंतर तिथे मध्यरात्री सूर्य मावळतो, परंतु पहाटे 4.30 वाजता पुन्हा उगवतो.
५) अलास्का: हा देश बर्फाच्या चादरीने व्यापलेला आहे आणि आपल्या सुंदर हिमनद्यांनकरिता ओळखला जातो. अलास्का असा देश आहे जेथे मे पासून जुलैच्या शेवटीपर्यंत सूर्य कधीच मावळत नाही. येथे रात्री साडे बाराच्या सुमारास सूर्यास्त होतो आणि 51 मिनिटांनी पुन्हा सूर्योदय होतो. ६) कॅनडा: कॅनडा आकाराने जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे, संपूर्ण वर्षामध्ये बर्याच वेळेस इथे बर्फ पडत असतो, ज्यामुळे तो बर्फाने झाकलेले राहतो . परंतु उन्हाळ्यात कॅनडामध्ये 50 दिवस सूर्य मावळत नाही. परंतु हे काही भागात घडते संपूर्ण देशात नाही……!!