नवनीत कौर राणा यांचा अभिनेत्री पासून खासदार पर्यंतचा प्रवास…

अमरावती मतदार संघातुन शिवसेनेचे भक्कम उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव करत नवनीत राणा यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली. २०१४ मध्ये त्यांचा पराभव झाला होता परंतु न खचता त्या जनतेशी संपर्क साधत होत्या आणि जनतेच्या मदतीला धावून येत होत्या त्यामुळेच की काय जनतेने आज त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि नवनीत राणा ह्या अमरावतीच्या खासदार म्हणून निवडून आल्या तर मित्रांनो आज आपण नवनीत राणा यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत….

नवनीत राणा यांचे लग्ना पूर्वीचे नाव नवनीत कौर असे आहे. त्यांचे आई-वडील पंजाबचे आहेत परंतु नवनीत राणा यांचा जन्म मुंबई मध्ये झाला म्हणूनच लहानपणापारून महाराष्ट्रातील लोकांच्या संपर्कात असल्या मुळे आज त्या मराठी एकदम शुद्ध बोलतात. नवनीत राणा यांचे शालेय शिक्षण देखील महाराष्ट्रातच पूर्ण झालं आहे. त्यांनि 12 वी पर्यंत शिक्षण घेतले आणि नंतर शिक्षण सोडून त्या मॉडेलिंग करू लागल्या….!! नवनीत राणा यांनी आपले नशीब आजमवण्यासाठी कला क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांनी तमिळ, तेलगू , पंजाबी आणि हिंदी चित्रपटात देखील काम केलं आहे. नवनीत राणा यांनी पहिल्यांदा कन्नड भाषेतील “दर्शन” या चित्रपटात काम केले आहे. नंतर सेनू बासंती लक्ष्मी, चेतना,जगापाती, गुडबॉय या सारख्या तेलगू चित्रपटात देखील काम केले आहे.

3 फेब्रुवारी 2011 मध्ये नवनीत यांचे लग्न रवी राणा यांच्याशी झालं. तेव्हा रवी राणा अमरावती मध्ये बडनेरा येतील आमदार होते. लग्न झाल्यानंतर नवनीत राणा यांनी राजकारणात प्रवेश करायचे ठरवले पहिल्यांदा 2014 मध्ये त्या अमरावती मतदार संघामधून उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या होत्या परंतु त्यावेळेस त्यांचा पराभव झाला. हार न मानता पुन्हा त्या त्याच जोमाने परत उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या आणि त्यांना यावेळेस यश देखील मिळाले.

अमरावती मतदार संघात शिवसेनेकडून आनंदराव अडसूळ यांना उमेदवारी देण्यात आली होती. नवनीत राणा यांनी शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा 36951 मतांनी पराभव केला. 507844 मते मिळाली तर आनंदराव अडसूळ यांना 470549 च मते मिळाली आहेत. नवनीत राणा आणि आनंदराव अडसूळ यांच्यातील शाब्दिक चकमकीने अमरावती मतदार संघ चर्चेत आला होता. गेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा नवनीत राणा यांनी काढला आहे. नवनीत या तेलगू अभिनेत्री असल्याने त्यांच्या मध्ये मतदारांचे विशेष आकर्षण होते . राणा यांना तब्बल 1लाख महिलांचे मतदान मिळालेची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नवनीत राणा यांच्या भावी आयुष्य साठी mahiti. in ह्या आमच्या वेबसाईट कडून खूप खूप शुभेच्छा…….!!
तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा…

Leave a Reply

Your email address will not be published.