दररोज लिपस्टिक वापरणाऱ्या महिला त्यांच्या संपूर्ण आयुष्यात चक्क २ किलो लिपस्टिक खातात….

लिपस्टिक असे एक मेकअप प्रॉडक्ट आहे की, ज्या मुली मेकअप करत नाहीत त्यांना देखील ते आवडते. लिपस्टिक काही मिनिटांतच आपल्या चेहऱ्यावर ताजेपणा आणते आणि आपला संपूर्ण लूक बदलते. आम्ही आज तुम्हाला हजारो शेड्समध्ये उपलब्ध असलेल्या लिपस्टिकविषयी 9 मनोरंजक गोष्टी सांगणार आहोत. त्यातील काही गोष्टी तुम्हाला हासवतील तर, काही तुम्हाला आश्चर्यचकित करतील.

1) जेव्हा लिपस्टिकचा शोध लागला तेव्हा ती स्मज-प्रूफ नव्हती. खरं तर, दुसर्‍या महायुद्धात, Dermatologist प्रयोगशाळेत काम करत असताना केमिस्ट हेजल बिशप यांना किस-प्रूफ फॉर्मूला मिळाला. आणि अशा प्रकारे जगाला स्मज-प्रूफ लिपस्टिक मिळाली. 2) तुम्ही कधी कधी असा विचार केला आहे का की पूर्वीच्या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटात महिला काळ्या रंगाची लिपस्टिक का लावत होत्या….? कारण तेव्हा पडद्यावर रंगीबेरंगी दाखवणाऱ्या तंत्राचा शोध लागला नव्हता, त्यामुळेच अभिनेत्री लालऐवजी काळ्या रंगाची लिपस्टिक लावायची. जेणेकरून पडद्यावर काळा रंग उठून दिसेल.

३) तुम्हाला माहित आहे का की जी स्त्री दररोज लिपस्टिक लावते, ती स्त्री तिच्या संपूर्ण आयुष्यात जवळपास 2 किलो लिपस्टिक खात असते… ☺ म्हणून आपल्या वाढत्या वजनाला फक्त खाणाऱ्या अन्नाला दोष देऊ नका. ४) पूर्वीच्या काळात स्त्रिया प्रत्येक शेड ची लिपस्टिक लावायची. न्यूड्स, लाल, गुलाबी आणि येवढेच न्हवे तर काळ्या व पांढऱ्या रंगाची देखील लावत होत्या. 1960 च्या दशकात आधुनिक संस्कृतीत वाढ होत असताना, लोकांनी ओठांवर पांढरी लिपस्टिक लावायला सुरुवात केली. त्याच काळापासून पांढर्‍या लिपस्टिकचा ट्रेंड सुरू झाला. ५) जर तुम्हाला असे वाटत असेल की लिपस्टिक एखाद्याच्या नात्यात अडथळा ठरू शकते? तर इंग्लंडमध्ये ट्यूडर काळातील हा कायदा वाचा. त्यावेळी एक कायदा करण्यात आला होता की लग्नाच्या वेळी महिलेने लिपस्टिक लावली असेल तर तिच्या भावी पतीला त्याच वेळी लग्न खंडित करण्याचा अधिकार आहे. तरी बरे झाले की, हा कायदा आज भारतात नाही.

६) जगातील सर्वात महाग लिपस्टिक म्हणजे ग्वर्लेन ची एक्सक्लूसिव किसकिस गोल्ड आणि डायमंडल लिपस्टिक. याची किंमत अंदाजे 42,61,570 रुपये आहे. जाणून आश्चर्यचकित झाले! तर या लिपस्टिकबद्दल हे देखील जाणून घ्या की ही केवळ लिपस्टिकची ट्यूब नव्हे तर 199 हिरे आणि 110 ग्रॅम सोन्याने बनलेली आहे. आता तुम्हाला हिची किंमत बरोबर वाटत आहे का? ७) दुसर्‍या महायुद्धात विस्टन चर्चिल यांनी सौंदर्यप्रसाधनांमध्ये फक्त लिपस्टिक हाच product सुरू ठेवला होता, कारण त्यांचा असा विश्वास आहे की यामुळे मनोबल वाढते. आम्हाला देखील हेच वाटते….!

८) राणी एलिज़ाबेद यांना लिपस्टिकच्या खूप आवडत होती. येवढेच न्हवे तर जेव्हा त्या खूप आजारी होत्या तेव्हाही त्या लिपस्टिक लावत असत आणि मृत्यूच्या अगोदर देखील त्यांनी लिपस्टिक लावलेली होती. त्यांना लिपस्टिक खूप प्रिय होती ते ह्यावरून समजू शकते की त्यांनी लिपस्टिक ला चलन प्रमाणे वापरण्याची परवानगी दिली होती. ९) लिपस्टिक शेड्सची चमक वाढविण्यासाठी, आजही, माशांचे स्केल्स , म्हणजे त्यांच्या वरील सुरक्षात्मक आवरनाचा वापर केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published.