चलन टाळण्यासाठी या व्यक्तीने वापरली नवीन युक्ती, पाहून पोलिसही झाले खुश…

देशभरात नवीन वाहतुकीचे नियम लागू झाल्यानंतर सर्वत्र चलन सुरू असल्याची चर्चा आहे. गुजरातच्या वडोदरामध्ये एका व्यक्तीला चलन टाळण्याचा अनोखा मार्ग सापडला आहे. वास्तविक, वडोदराच्या राम शाह यांनी चलन टाळण्यासाठी अशी युक्ती वापरली आहे, ते पाहून वाहतूक पोलिसही खूष झाले. दुचाकी चालवणाऱ्या राम शाह यांनी हेल्मेटवरच वाहनचे आरसी बुक, विमा स्लिप, ड्रायव्हिंग परवान्यासह सर्व आवश्यक कागदपत्रे चिकटविली आहेत.

आता वाहतूक पोलिसांना राम शाहच्या हेल्मेटवरच सर्व काही मिळते आणि पोलिसही आनंदी होतात. राम शहा म्हणतात की यामुळे मला त्रास होत नाही . 1 सप्टेंबरपासून नवीन मोटार वाहन कायदा अस्तित्त्वात आला आहे. यासह वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची रक्कमही अनेक पटींनी वाढली आहे. दिल्ली, मुंबई, गुरुग्राम, बेंगळुरू येथे पोलिस वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या लोकांवरती वारंवार दंड आकारत आहेत.

अलीकडेच बेंगळुरू ट्रॅफिक पोलिसांनी गेल्या 5 दिवसांचा डेटा जाहीर केला आहे. ज्यात 72 लाख 49 हजार 900 रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आले आहेत. ह्यामध्ये सर्वात ज्यास्त दंड वाहन चालकाने हेल्मेट न घातल्यामुळे झाला आहे, भले त्यामध्ये दुचाकी वाहन चालक असो किंवा दुचाकी वाहनावर मागे बसणारी व्यक्ती असो. बेंगळूरू पोलिसांनी जाहीर केलेला डेटा 4 ते 9 सप्टेंबर या कालावधीतील आहे.

नवीन वाहतूक कायदा लागू झाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव लावण्यात आलेल्या दंडात दहा पट वाढ करण्यात आली आहे. नवीन मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर विना परवाना वाहन चालविताना 5000 रुपये दंड व जर तुम्ही दारूच्या नशेत पकडल्यास 10,000 रुपये दंड वसूल केला जात आहे. जर एखादा अल्पवयीन वाहन चालविताना पकडला गेला असेल तर वाहन मालकास तुरूंगात टाकले जाऊ शकते. या व्यतिरिक्त, वेगाने वाहन चालविण्याकरिता 1000 ते 2000 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो, हा दंड पूर्वी 400 रुपये होते. त्यानंतर सोशल मीडियावर हा विषय चर्चेत राहिला आहे, अनेक ठिकाणी पोलिसांच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दलचे चलन कापले गेले आहेत. तर त्याचवेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावर म्हणाले आहेत की लोकांनी कायद्याचे पालन केले पाहिजे, ते म्हणाले की त्यांचे देखील चलन कापले गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.