केबीसीचे होस्टिंग महानायक अमिताभ बच्चन यांना शो मध्ये त्यांनी दिल्लीत घालवलेल्या काही दिवस आठवले, “जेव्हा ते विद्यार्थी होतो आणि सुंदर मुलींसह बसमध्ये प्रवास करत होते.” अमिताभ म्हणाले, “मी तीन मुर्तीजवळ राहत होतो आणि दररोज कॉलेजला जाण्यासाठी बस पकडत होतो. ही बस संसद आणि सीपी (कनॉट प्लेस) च्या जवळून जात होती आणि मग पुढे मला विद्यापीठाजवळ सोडायची. “
कौन बनेगा करोडपती शोच्या शूटिंग दरम्यान अमिताभ म्हणाले की, ही बस खासकरुन सीपीच्या मुलींना, आईपी कॉलेज आणि मिरांडा हाऊस मध्ये घेऊन जायची. त्यामुळे आम्ही स्टॉपवर थांबण्यासाठी आणि त्यात सुंदर मुलीं चढण्याची प्रतीक्षा करायचो.” जुन्या आठवणी सांगत ते म्हणाले, “बर्याच वर्षांनंतर जेव्हा मी विद्यापीठातून पदवी संपादन केली आणि नोकरी सुरू केली, तेव्हा त्या सुंदर महिलांपैकी एका सुंदर महिलेला भेटलो जी माझ्या बसमध्ये प्रवास करायच्या.”

पुढे बोलताना अमिताभ म्हणाले की, “त्या महिलेने त्यांना सांगितले की कॉलेजच्या त्या दिवसात बसच्या प्रवासादरम्यान, ती अमिताभ यांची एक झलक पाहण्यासाठी वाट पाहायची .” ही महिला तिच्या प्राण मित्रासोबत बसस्टॉपवर उभी असायची. ती महिला म्हणाली की जेव्हा बस यायची तेव्हा माझ्या मनात एकच विचार असायचा – “प्राण (तिचा मित्र) जायला हवा पण बच्चन जाऊ नयेत.”