जर तुम्ही दुचाकी वाहन चालवत असाल आणि दररोज हेल्मेट घालून घराबाहेर पडत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. जर तुमच्याकडे हेल्मेट असेल आणि तुम्ही ते दररोज घालून गाडी चालवत असाल पण ते हेल्मेट ISI हॉलमार्कचे नसेल तर तुमच्यावर तेवढाच दंड बसेल जेवढा तुम्ही हेल्मेटशिवाय गाडी चालवताना आकारला जातो. 1 सप्टेंबर पासून लागू झालेल्या सुधारित मोटार वाहन कायद्यानुसार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून भरमसाठ दंड आकारला जात आहे.
हेल्मेट मध्ये आजकाल दिल्लीत आणि देशातील शहरांमध्ये रस्त्याच्या कडेला तातपुरते चालणाऱ्या quality ची विक्री खूप वाढली आहे. रस्त्याच्या कडेला विकले जाणारे हे हेल्मेट 100 ते 200 रूपये मिळत आहे आणि बहुतेक लोक दंड टाळण्यासाठी ते विकत घेत आहेत. तथापि, हे स्वस्त आणि कमकुवत गुणवत्तेचे हेल्मेट ड्रायव्हरचे रक्षण करत नाही, कारण ते स्थानिक दुकानात बनलेले असते. त्या हेल्मेट वरती कोणतीही टेस्ट झालेली नसते, ज्यामुळे त्याचे अपघातवेळेचे सामर्थ्य शोधले जाऊ शकते. त्यामुळे आता वाहतूक पोलिस प्रत्येकाचे हेल्मेट तपासत आहेत आणि ज्यांच्या हेल्मेटवर ISI मार्क नसेल त्यांना 1000 रुपये पर्यंत दंड चार्ज लावत आहेत.

ट्रॅफिक पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ISI हॉलमार्क असलेले हेल्मेट हे स्वस्त आणि टॉप-नॉच हेल्मेटपेक्षा थोडे जास्त महाग आहे, परंतु ते आपल्या जीवाचे रक्षण करते आणि ISI मार्क असलेले हेल्मेट अपघातात कधीच तुटत नाही, ज्यामुळे ड्रायव्हरच्या डोक्याला कमी इजा होते.