अबब, चक्क पाण्यावर तरंगणारे एक गाव…

प्रत्येकाला आपली घरे स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याची इच्छा असते आणि कोणाचीही इच्छा नसते की त्यांचे घर कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे आणि हे सर्व टाळण्यासाठी लोक बरेच उपाय करतात. पण आपल्याला माहित आहे का जगात असे एक गाव आहे जे समुद्रामध्ये तरंगत आहे? आज आम्ही तुम्हाला या विचित्र गावाविषयी सांगणार आहोत… आपण बोलणार आहोत चीनमधील एका गावाबद्दल जे पाण्यावर तरंगत आहे. होय, चीनच्या निंगडे शहरात एक गाव आहे जे समुद्रावर तरंगते आहे. येथे सुमारे 7,000 मच्छिमार राहतात.

तेथील स्थानिकचे लोक त्यांना टंका म्हणतात. हे सागरी मच्छिमारांचे गाव दक्षिणपूर्व चीनमधील फुजियान प्रांतातील निंग्डे (Ningde) शहराजवळ तरंगत आहे. टंकांना ‘जिप्सी ऑन द सी’ म्हणून देखील ओळखले जाते.

हे गाव 1300 वर्षापासून आहे.

चीनचे हे गाव 1300 वर्ष जुने आहे आणि या गावात सुमारे 8500 लोक राहतात. टांकातील लोकांची कहाणीही बरीच रंजक आहे. त्यांचे सर्व जीवन पाण्याची घरे, आणि मासेमारी शिकविण्यात व्यतीत होते. टंका मधील लोकांनी तरंगणाऱ्या घरांची बांधली केली आहे, येवढेच न्हवे तर त्यांनी लाकूडांचे मोठे प्लॅटफॉर्म बनवले आहेत. या मच्छिमारांची घरे पाहण्यास अतिशय सुंदर आहेत. हे लोक किनाऱ्यावर कधीच येत नाहीत किंवा समुद्राच्या बाहेर राहणाऱ्या लोकांशी किधीही संपर्क साधत नाहीत. या गावाची कहाणी तेव्हा सुरू झाली जेव्हा 700 ईस्वी मध्ये तांग राजवंश यांची सत्ता होती.

त्यावेळी टांका आदिवासी लोकांनी लढाई टाळण्यासाठी समुद्रावर थांबण्याचे ठरविले. तेव्हापासून त्याला ‘जिप्सीज ऑन द सी’ म्हणून ओळखले जाऊ लागले आणि आता ते पृथ्वीवर क्वचितच पाऊल ठेवतात.

Leave a Reply

Your email address will not be published.