पंतप्रधानांच्या बॉडीगार्डच्या ब्रीफकेसमध्ये काय असते, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला पंतप्रधानांच्या सुरक्षेविषयी काही रोचक गोष्टी सांगणार आहोत, खरं तर भारतीय पंतप्रधानांना संरक्षण देण्याची जबाबदारी एसपीजी म्हणजेच ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’ च्या कमांडोनी केली आहे. ही सुरक्षा पंतप्रधान, माजी पंतप्रधान तसेच खास परदेशी पाहुण्यांना पुरविली जाते. सर्व एसपीजी कमांडो काही सेकंदात आपली पोझिशन्स घेतात,ते खूपच चपळ असतात आणि सर्व FNF -2000 असॉल्ट रायफल, Automatic Gun आणि 17 एम नामक खतरनाक पिस्तूल यासारख्या आधुनिक हत्यारांनी सज्ज असतात. या अंगरक्षकांच्या हातात ब्रीफकेस देखील असतात.

या ब्रीफकेस तुम्हाला 26 जानेवारीच्या परेड मध्ये किंवा निवडणुकीच्या असतात त्यावेळीही पाहायला मिळतात. तुम्ही कधी विचार केला आहेत का की या ब्रीफकेसमध्ये नक्की काय असेल…? तुम्हाला सांगूं इच्छितो की ब्रिफकेससारखे दिसणाऱ्या त्या सूटकेसमध्ये प्रत्यक्षात काय आहे.? खरं तर ते पोर्टेबल फोल्ड आउट बॅलिस्टिक शील्ड आहे. जे एनआयजी लेव्हल 3 चे संरक्षण प्रदान करते. ते दिसायला खूपच पातळ आहे. जर सुरक्षिततेत गुंतलेल्या लोकांना कोणत्याही प्रकारचा धोका जाणवत असेल तर त्यांना ती सुटकेस फक्त खालील दिशेने उघडायची असते. मग हे ढाल म्हणून कार्य करते.

तुम्हाला सांगूं इच्छितो की या ब्रीफकेसमध्ये एक गुप्त कप्पा देखील आहे ज्यामध्ये पिस्तूल ठेवलेली असते. एसपीजीबरोबर काउंटर अटॅक टीम (CAT) देखील असते जी संरक्षणाच्या विविध पद्धती वापरते. एसपीजी कमांडोची निवड “केंद्रीय सशस्त्र पोलिस दल” आणि “रेल्वे संरक्षण दल” यांच्या जवानांनमधून केली जाते. ह्या टीम ला कोणत्याही हल्ल्यादरम्यान पंतप्रधानांना संरक्षण देण्याची खूप कठीण असे प्रशिक्षण दिले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published.