संभाजी महाराजांना कोंढाजी फर्जंद यांचे तुटलेले शीर भेटते तेव्हा…

छत्रपती संभाजी महाराजांनी कोंढाजी फर्जंद यांच्यासह 11 मावळ्यांना जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी सिद्धीच्या गोटात पाठवलं होतं. संभाजी महाराजांचा गनिमी कावा होता की कोंडाजी फर्जंद जेव्हा जंजिऱ्यावरील दारूचे कोठारे पेटवून देतील तेव्हा किनाऱ्यावरून स्वतः शंभुराजे जंजिऱ्यावर आक्रमन करणार होते. ठरलेल्या योजणे प्रमाणे शंभुराजे जंजिऱ्यावरील दारु कोठारांना आग लागण्याची वाट पाहत असतात. परंतु तेवढ्यात धपा-धप पावले टाकत एक मावळा शंभुराजेंच्या दिशेने येतो.

प्रचंड घाबरलेल्या त्या मावळ्याकडे पाहून शंभूराजेंच्या अंगावरती सरकण काटा उभा राहतो. त्या मावळ्याने शंभुराजेंना झटकन मुजरा केला आणि आपल्या बगलेत गुंडाळलेली पोत्याची गुंडाळी शंभुराजेंच्या समोर ठेवली…. महाराजांनी हे काय आहे..? असे विचारताच त्या मावळ्यांने त्या पोत्याची गुंडाळी सोडली डोळ्यासमोरचे दृश्य पाहताच सर्वांना घाम फुटला त्या गुंडाळी मध्ये किनाचेतरी अर्धवट जळालेले मुंडके होते. ते भयानक दृश्य पाहून सारे थप्प झाले. तो मावळा शंभूराजेंच्या पायावर्ती कोसळला आणि मोठ्या आक्रोशकरत बोलला की “ही मुंडी कोंढाजी बाबांनचीच आहे”.

कोंढाजींचे ते शीर पाहुन शंभुराजेंना काय कळेना शंभू राजे तसेच खाली गुढग्यावर बसले पालखेतून एकादी देवाची मूर्ती एखाद्या पुजाऱ्याने बाहेर काढून मोठ्या भक्ती भावन हाती भरवी तसे त्यांनी कोंढाजींचे शीर अलगत पणे आपल्या हातावर धरले. आणि दुसऱ्याच क्षणी राजेंनी काळीज फुटणारा हंबरटा फोडला “अस कस विपरित घडलं कोंडाजी बाबा” म्हणत कोंढाजींचे शीर घेऊन आलेल्या त्या मावळ्याकडे नजर टाकली तो वीर पुरता गलबलून गेला होता. त्याच्या दोन्ही डोळ्यांतून आश्रू वाहत होते हुंदका आवरतच ती सांगू लागला.

राज आपण आणि कोंढाजी बाबांनी ठरवलेल्या गुप्त योजणे प्रमाणे सार काही घडत होतं कोंढाजी बाबा आणि आम्ही सगळे मावळे जंजिरा फते करणारच होतो. पण इतक्यात शंभुराजेंनी विचारले अरे पण हा घात झालाच कसा. तो सांगू लागला, राज या देवाण आणि दैवान जर अजून थोडी खैर केली असती ना तर काल रात्रीच जंजिऱ्यावरचे सर्वच्या सर्व दारूगोळ्यांचे कोठार धडाधड पेटली असती आसमाणात उड्या घेणारा अग्नी लाल ज्वालानी पेटताना आपल्याला कालच दिसला असता. कोंढाजी बाबा आणि आम्ही 11 साथीदार जंजिऱ्याच्या काळजाचा पोलादी लगदा पोखरून आत कश्यासाठी घुसलो याचा कोणालाच ठाव ठिकाना न्हवता अगदी काल रात्रीपरेंत आमचं नियोजन आनंदी अचून होतं.

जंजिऱ्यावरील 8 मोठाले बरुदखाने एकाच वेळी कसे आणि कोणी पेटवायचे याची तयारी झाली होती. तेथील काही मोजक्या मंडळींनाही भरपूर द्रव्य देऊन बाबांनी आपल्या बाजूने वळवलं होतं. कालच्या मध्यरात्री सर्व दारुकोठारे पेटवायचा मुहूर्त ठरला होता. किल्ल्याच्या मागच्या दरवाज्याजवळ पाण्यात एक पडाव तयार केला होता. कामगिरी फते झाली की आपल्या मावळ्यांनी ताबडतोब मागच्या डुंठोकायची आणि पडावात बसून आपल्याकडे निघून यायचं होतं. पण आईनं वेळी सिद्धीने कोंढाजी बाबांना नजराणा म्हणून पेश केलेल्या लवंगी दिलरुबाच्या दासीन कपडे घ्यायला जायच्या बहाण्यान सरळ सिद्धीच्या महालात जाऊन सिद्धीला सगळी योजना सांगितली.

तो मावळा पुढे सांगू लागला दासेकडून ही बातमी फुटताच किल्ल्यावर धोक्याच्या घंटा वाजू लागल्या एकाच वेळी अघ्याम्हवाच पोळ फुटाव तस सिद्धीचे दोन-तीन हजार सैनिक आम्हा मावळ्यांच्या पाठीमागे लागले आमच्या पैकी तिघांनी बुरुजावरून खाली उड्या ठोकल्या, दोघांचा तिथेच बाण काळजावर लागून मृत्यूव झाला, कोंढाजीसह इतर मावळ्यांना नगारखानाजवळ एका ओळीत उभा केलं गेलं आणि समशेरीन सर्वांच्या मुंड्या उडवल्या गेल्या. सर्वांचे धड तोफेला बांधून उडवून दण्यात आले. आणि दुर्दयवाने पळता-पळता किल्ल्यात मागच्या जागेतील एक कोपऱ्यात मला लपता आलं. आणि म्हणून मी वाचलो राज….

आपल्या सर्व मावळ्यांची मुंडकी कासमाच्या त्या सैनिक कुत्र्यांनी मागच्या बाजूस ओढत आणली. मागच्या दरवाजाच्या बाहेर समुद्राकाठी एका ओत्यावर लाकडं पेटवली गेली. आणि त्या ज्वालेत मुंडकी फेकली गेली. सिद्धीचे ते हरामी कुत्रे विजयाच्या उम्मदत नाचत होती. तसेच नाचत नाचत आत किल्ल्यात निघून गेले. आणि त्या नादात त्यांचा मागील पहारा कमी झाला. तेव्हा तटावरून खाली गेलेल्या एका रानवेलीच्या आधाराने मी कसा बसा फरफटत खाली उतरलो. तिथेच त्या जाळात मला कोंढाजीं बाबांचे अर्धवट जळालेले मुंडके दिसल आणि त्या मुंडीनेच माझ्या फाटलेल्या अंगात पुन्हा एकदा बळ दिल.

राज लय तकलीप झाली इकडे येताना पण जीवाला म्हंटलं आपल्या कर्णिची वाट बघत किल्ल्याकडे तुम्ही डोळेलावून बसले असणार. मी इथं पोहोचलो नसतो तर कोंढाजी बाबांची आणि त्यांच्या बहादूर मावळ्यांची ही कहाणी आपल्याला कशी कळणार राज.
कोंढाजीसह 11 मावळ्यांना जंजिरा मोहिमेमध्ये स्वतःचा जीव गमवावा लागला पण तरीही जंजिरा हाती आला नाही… पण शेवटी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः जंजिरा मोहीम स्वतःच्या हाती घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published.