चंद्रयान -2 मिशन अयशस्वी नसून, ९५% यशस्वी आहे, जाणून घ्या चंद्रयान 2 मिशन यशस्वी का आहे ते…

भारताच्या चंद्रयान -2 प्रकल्पाबद्दल काल संपूर्ण देश उत्साहित झाला होता. सर्वांची नजर चंद्रयान -2 लैंडर विक्रमवर होती. तथापि, चंद्राच्या पृष्ठभागापासून फक्त 2.1 किलोमीटर अंतरावर इस्रोचा लैंडर विक्रमशी संपर्क तुटला. अशा परिस्थितीत सर्वांच्या चेहऱ्यावर निराशा होती. सर्वसामान्यांना वाटले की हे मिशन अयशस्वी झाले आहे. पण तसे सांगणे पूर्णपणे योग्य ठरणार नाही. ही मोहीम अपयशी ठरली नाही. त्यापेक्षा ह्याने 95 टक्के पर्यंत यश मिळविले आहे. लैंडर विक्रमशी संपर्क तुटल्यामुळे मिशनला केवळ 5 टक्के नुकसान झाले आहे. हे स्पष्ट करू इच्छितो की आपल्या चंद्रयान 2 साठी लैंडिंग करण्यासाठी भारताने एक कठीण मार्ग निवडला होता. त्याला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या भागात जगातील इतर कोणताही देश पोचला नव्हता त्या भागावर उतरायचे होते.

 चंद्रयान -2 मिशन मध्ये 978 कोटी इतका खर्च झाला आहे. हे पैसे वाया गेले नाहीत. इसरो च्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की केवळ मिशनमध्ये फक्त लैंडर विक्रम आणि प्रज्ञान रोवर यांना नुकसान झाले आहे. ह्या मिशनच्या ध्येयामध्ये 5 टक्के तोटा आहे. आमच्या अंतराळ यानाचा तिसरा विभाग ऑर्बिटर अजूनही सुरक्षित आहे आणि चंद्राच्या कक्षेभोवती फिरत आहे. ही मोहीम एक वर्षाच्या कालावधीची आहे, म्हणून हा ऑर्बिटर चंद्राचे बरेच फोटो इसरोंना पाठवणार आहे. आणखी एक सकारात्मक गोष्ट अशी आहे की हा ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेभोवती फिरत असलेला संपर्क तुटलेली लैंडरची छायाचित्रे देखील घेऊ शकतो. अशाप्रकारे, इसरो यांना तेथील स्थितीबद्दल बरेच अधिक माहिती मिळू शकेल.

तुम्हाला माहितीसाठी, सांगूं इच्छितो की चंद्रयान -2 तीन विभागांमध्ये बनलेला आहे. त्यातील पहिल्या विभागात ऑर्बिटर असे म्हणतात जो 2379 किलो वाजनाचा आहे आणि त्यामध्ये आठ पेलोड आहेत. दुसर्‍या विभागात विक्रम आहे त्याचे वजन 1471 किलो आहे व पेलोड चार आहेत. शेवटी, प्रज्ञाचा तिसरा विभाग 27 किलो वजनाचा आहे. यात दोन पेलोड आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की लैंडर विक्रम 2 सप्टेंबर रोजी ऑर्बिटरपासून विभक्त झाला होता. यानंतर, ‘रफ ब्रेकिंग’ आणि ‘फाईन ब्रेकिंग’ सारख्या टप्प्या यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, ते काल, 6 सप्टेंबरला ‘सॉफ्ट लैडिंग’ च्या टप्प्याकडे लागले होते. तथापि, हे होण्यापूर्वीच पृथ्वीवरील इसरोचा संपर्क तुटला होता. इसरो प्रमुख सिवन यांच्यानुसार, सध्या ह्या आकडेवारीचे विश्लेषण केले जात आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील इसरो स्थानकात उपस्थित होते. जेव्हा लैंडर विक्रमशी संपर्क तुटला तेव्हा सर्वजण निराश झाले. अशा परिस्थितीत मोदीजींनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि निराश होऊ नका असे सांगितले. मोदीजी म्हणायचे की जीवनात चढ-उतार येतात. आम्ही भविष्यात पुन्हा प्रयत्न करू. दुसरीकडे सोशल मीडियावरही देशाच्या जनतेने इसरो यांनी या अभियानाची चांगली साथ दिली असून आपले योगदान खूप चांगले असल्याचे सांगितले. एका युजर ने लिहिले की आत्ता संपर्क तुटला आहे, संकल्प नाही . प्रयत्न सुरूच राहतील. त्याचबरोबर बॉलिवूड आणि राजकारणाच्या सर्व सेलिब्रिटींनीही इसरोचा हौसल वाढवत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *