बहुतेक जणांना असे वाटते की जगातील सर्वात महागडे चलन अमेरिकेचे डॉलर हेच आहेत. पण असे काही देश आहेत ज्यांच्या चलनाची किंमत अमेरिकन डॉलर पेक्षाही जास्त आहे… चला तर आज आपण जाणून घेऊया जगातील पाच सर्वात महागड्या नोटा, जाणून घ्या कोणाची किंमत सर्वात जास्त आहे ते…
कुवैती दिनार कुवैतचे कुवैती दिनार हे जगातील सर्वात महाग चलन आहे. ज्याच्या नोट्स सर्वात मौल्यवान आहेत. भारताचे 236.55 रुपये खर्च केल्यावर एका कुवेती दिनारची नोट मिळेल.

बहरीन दिनार बहरिन दिनार ही सध्या जगातील दुसरी सर्वात महाग करन्सी आहे. आजच्या दराने बहरीन दिनार नोट खरेदी करण्यासाठी 190.58 रुपये द्यावे लागतात.

ओमानी रियाल ओमानी रियाल हे जगातील तिसरे सर्वात महागडे चलन आहे. ओमानी रियालची किंमत सुमारे 186.64 रुपये आहे.

जॉर्डन दिनार जॉर्डन दिनार ही जगातील चौथी सर्वात महाग चलन आहे. आजच्या किंमतीत जॉर्डन दिनार नोटच्या किंमतीची किंमत १०१ रुपये ३३ पैसे आहे.

जिब्राल्टर पाउंड जिब्राल्टर पाउंड हा स्पेनच्या आग्नेय स्पेनच्या सीमेवर वसलेला एक छोटासा देश आहे. तो आजही ब्रिटीश सार्वभौमत्व स्वीकारतो. येथे चलन जिब्राल्टर पौंड आहे. जिब्राल्टर पौंड नोटची किंमत सुमारे 88.37 रुपये आहे.
