शेवटपर्यंत अजिंक्य राहिलेल्या जंजिरा किल्ल्यावरील सिद्धीचा शेवट कसा झाला…

छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 पेक्षा ज्यास्त किल्ले स्वराज्याला जोडले. छत्रपती संभाजी महाराजांनी तर एकही लढाईत पराभव स्वीकारला नाही. पण दुर्दयवाने या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जंजिरा हा असा एकमेव किल्ला आहे. जो मराठ्यांना कधीच जिंकता आला नाही. कित्तेक वर्ष जंजिऱ्यावर सिद्धधींनी अजय अस वर्चस्व गाजवलं होतं. पण अनेकांना प्रश्न पडला असेल अखेर शिवाजी महाराजांनी प्रयत्न करूनही जंजिरा जिंकता आला नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःची ताकद पणाला लावून देखील जंजिरा जिंकता आला नाही. जंजिरा जिंकण्यासाठी गेलेल्या कोंडाजी फर्जंदयांनी सिद्धीन त्याचा जंजिऱ्यामध्ये ठार केल होत. इतके सर्व होऊन देखिल अखेर जंजिरा स्वराज्यात येऊ शकला नाही. परंतु ह्याचा जंजिऱ्यावर 300 पेक्षा ज्यास्त वर्षे स्वतःचे अस्तित्व गाजवणारे स्वतःच समर्थ दाखवणाऱ्या सिद्धीचा शेवट झाला तरी कसा….? हा प्रश्न आज पर्यंत अनेकांना पडला असेल.

जाणून घेऊयात अश्या अनेक प्रश्ननांच्या उत्तरा सह जंजिरा किल्ल्याचा संपूर्ण इतिहास….!! 15 व्या शतकाच्या अखेरीस मलिक अहमद ने निजामशाहीची स्थापणा केली. उत्तर कोकण चा ताबा घेत त्याने राजगड जिल्ह्यातल्या दंडा राजपुरीला मुख्य ठाणे बनवले. मिरजा अली आणि कलफ अली हे दोन निजामशाहीचे सरदार तिथे ठाणेदार म्हणून नेमले. तेथील मूळ वस्ती कोळ्यांची पण चाचे आणि लुटारू त्यांना सतत त्रास देत असत, म्हणून ठाणेदाराच्या परवानगीने राम पाटील ह्या कोळ्यांच्या प्रमुखाने तिथल्या दंडा राजपुरीच्या खाडी जवळील बेटावर मेडेकोट म्हणजेच लाकडी ओडक्यांचा किल्ला बांधला. पुढे ह्याच किल्ल्यावरती निजामशहाचा सरदार फिरंम खान याने आपण व्यापारी आहोत, असे सांगून किल्ल्यात प्रवेश मिळवला आणि आपल्या जवळील नशेली मध्य त्या कोळ्यांना पाजून त्यांना बेहोश करून त्यांच्या कत्तली केल्या कोळ्यांचा प्रमुख असणाऱ्या राम पटीलांना जेल बंद करून त्यांच सक्तीने धर्मांतर करण्यात आलं आणि तरीही राम पाटलांचा मुख्य स्वभाव न बदलल्या मुळे पुढे काही दिवसांनी त्यांचा ही शिरच्छेद करण्यात आला.

1617 मध्ये मलिक अंबर ने सिद्धी अंबर याला जंजिऱ्यावर पाठवले, जंजिऱ्याच्या सिद्ध्यांचा हा मूळ पुरुष मनाला जातो. सिद्धी म्हणजे अफ्रेकेतील ” ऍबेसिनिया ” या भागातून आलेली एक लढवयी जमात….!! अफसना या भागात राहणारे हे लोक ” हफशी” म्हणूनही ओळखले जातात.

राम पाटलांच्या वधा नंतर 1526 च्या सुमारास फिरंम खान व त्या नंतर बुर्हाणखान हा त्या मूलकाचा सुभेदार झाला. पुढे 1567 ते 1571 या काळामध्ये बुर्हाणखानयाने त्या मेडेकोटाच्या जागी पक्क्या दगडी जलदुर्गांची बांधणी केली आणि त्याच नाव ठेवलं जझिरा मेहरुब. जझिरा मेहरुब हा शब्द अरबी भाषेतून आला आहे. पुढे जझिरा या शब्दा पासूनच जंजिरा हा शब्द निर्माण झाला. जंजिरा किल्ल्याला भक्कम असे 19 बुरुझ आहेत, 2 बुरजांमधले अंतर 90 फुटांपेक्षा ज्यास्त आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा पूर्वेकडे असून तो जवळ गेल्याशिवाय दिसत नाही. तर पश्चिमेकडे समुद्राच्या कडेला एक दरवाजा आहे. किल्ल्यावर एक दर्यात दरवाजा देखील आहे. सिद्धी सानब नंतर सिद्धी अंबर, सुरुलखन, युसुबखन, फतेखान, इत्यादी अनेक सिद्ध्यांनी हा किल्ला अखेर पर्यंत मराठ्यांच्या हाती लागू दिला नाही. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकिर्दीत 6 वेळा, छत्रपती संभाजी महाराजांनी एकदा तर पेशवे काळात 5 वेळा असे तब्बल 12 वेळा मराठ्यांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केले. पण यामध्ये मराठ्यांना शेवट पर्यंत यश आले नाही.

फक्त मराठेच काय तर स्वतः मोगल आणि इंग्रज सुद्धा ह्या जंजिऱ्यावरील सिद्धीचं वर्चस्व संपवू शकले नाही. जवळपास 330 वर्षे अजिंक्य राहिलेल्या जंजिऱ्याच्या खासियत म्हणजे जंजिरा या जलदुर्ग वरील ह्या महाकायत तोफा भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र याशिवाय बुरुज जंजिऱ्याच्या ताटावर्ती असलेल्या त्या काळच्या 572 तोफा यामुळे जंजिरा अभेद्य होता. जंजिऱ्यावरील सर्वात मोठी आणि लांब पल्ल्याची तोफ म्हणजेच कालालबांगडी होय. सध्या स्तिथीमध्ये जंजिऱ्यावर कालालबांगडी, landatasam आणि chauri या तोफा आपल्याला आजही पाहायला मिळतात. महाकाय समुद्राचे सवरक्षण आणि आग ओखणाऱ्या भयंकर तोफा यामुळेच जंजिरा कोणालाही जिंकता आला नाही.

जंजिऱ्याचा पहिला सिद्धी सुभेदार होता सिद्धी सुरुल अब्दुल्लाखान 1620 पासून तो जंजिऱ्याचा किल्लेदार होता. जंजिऱ्यावरील सिद्धीच्या शासनाचा मूळ पुरुष सिद्धी अंबर हा ओळखला जातो. जंजिऱ्याचा पहिला सिद्धी सुभेदार सिद्धी सुरुड अब्दुल्लाखान याच्या नंतर पुढे जवळपास 20 सिद्धी शासकांनी जंजिऱ्यावर राज्य केले. जवळपास 330 वर्षे अजिंक्य राहिलेल्या आणि तब्बल 20 सिद्ध्यांची कारकीर्द पाहिलेला जंजिरा……!! 3 एप्रिल 1948 ला जंजिरा हा जलदुर्ग स्वतंत्र भारतामध्ये विलीन झाला. जेव्हा जंजिरा भारतीय संघ राज्यात विलिन झाला तेव्हा जंजिराचा शेवटचा सिद्धी शासक होता सिद्धी मुहम्मद खान…!!

जंजिरा भारत विलिन झाल्यावर जंजिऱ्यावरील सर्व वस्ती तिथून उठून गेले. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात चारही बाजूंनी पाण्याचा वेढा पडलेला उसळत्या सागरामध्ये अतिशय रहस्यमय पद्धतीने बांधला गेलेला जंजिरा किल्ला….!! छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज, मुघल आणि इंग्रज कोणालाही कधीच जिंकता आला नाही जंजिरा शेवट पर्यंत अजिंक्यच राहिला…..!!

Leave a Reply

Your email address will not be published.