प्रतापगडावर शिवरायांच्या भेटीला येण्यापूर्वी अफझलखानाने आपल्या ६४ बायकांबरोबर काय केले…

विज्यापुरच्या आदिलशाही दरबारातील सर्वात बलशाली सरदार म्हणून ज्यांची ख्याती होती, तो सरदार म्हणजे अफजलखान, अफजलखान म्हणजे स्वराज्यावर आलेले सर्वात मोठे संकट होते कारण ताकद, राजकीय बुद्धिमत्ता आणि भयंकर क्रूरता या तीनही गोष्टींचा संगम खानाच्याकडे होता. तुम्हाला या माहिती मध्ये अफजल खानाच्या वधाची कथा सांगणार नाही तर अफजलखाना बद्दल फारच कमी लोकांना माहिती असणाऱ्या विलक्षण गोष्टी सांगणार आहे.

अफजल खानासोबत शिवाजी महाराजांचे राजकीय वैरासोबतच वयक्तिक वैर सुद्धा होत. अफजल खानाविषयी माँसाहेब जिजाऊंना आणि शिवाजी महाराजांना भयंकर संताप होता कारण एक म्हणजे शिवाजी महाराजांचे जेष्ठ बंधू संभाजी राजे यांच्या मृत्यूलाही अफजल खान जवाबदार होता. त्याने छळ-कपट करून शिवाजी महाराजांच्या जेष्ठ बंधूंना ठार केले हिते. दुसरे कारण म्हणजे अफजल खानाने शहाजी महाराजांना देखील बेड्या ठोकल्या होत्या, केवळ मुत्सद्दी पणामुळेच शाहजी राजे बचावले होते. अफजल खान अत्यंत क्रूर निर्दयी आणि स्वार्थी होता. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल अफजल खान एक शायर आणि कवी सुध्दा होता. त्याला संस्कृत भाषेचही ज्ञान होत तो एक नंबरचा नास्तिक होता. त्याने पर्शियन भाषेत एक शेर लिहिला होता. त्याचा मराठी भाषेत असा अर्थ होतो, जेव्हा कधी देवाला भीती वाटेल तेव्हा तो देव सुद्धा अफजल खान तू मला वाचव असे म्हणेल यातून त्याचा स्वतः विषयीचा महाभयंकर गर्व दिसून येईल.

अफजल खान इतका क्रूर होता की त्याने कित्तेक लोकांना दगा फटका करून ठार केले होते. तो सत्ता धारण आणि राजकारणामध्ये प्रचंड क्रूर आणि स्वार्थी होता, पण स्वतः च्या जहागिरीतील लोकांनविषयी प्रचंड न्यायी, दयाळू आणि उदार हृदयाचा असल्याचा दाखवत होता. अफजल खानचा देवावर विश्वास नसला तरी शुभ-शकुन आणि भविष्य त्योतिष्य यांवर विश्वास होता. त्याने विजयापुरच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांना संपवन्याचा विडा उचलला तेव्हा त्याने एकांतात एका फकिराला स्वतः चे भविष्य विचारले होते. त्यावेळी त्या फकिरने त्याला सांगितले या युद्धात तुझा पराभव होईल कदाचित या लढाईत तू परत मागरी सुद्धा येऊ शकणार नाहीस. त्या फकिराचे ते शब्ध ऐकले आणि अफजल खान त्या फकिरावर प्रचंड संतापला त्याला त्याच्या शक्तीवर इतका प्रचंड गर्व की आपल्याला कोणी पराभूत करू शकणार नाही. असा त्याचा ठाम विश्वास होता पण प्रताप गडच्या मोहिमेवर निघत असताना अफजल खानाबरोबर एक दु:खत घटना घडली. त्याच्या सैन्य दलातला झेंड्याचा हत्ती ज्याचे नाव होते फते लष्कर हा अचानकपणे मरण पावला.

साहजिकच अफजल खानाच्या मनामध्ये शंका-कुशंका येऊ लागल्या अफजल खानाला ऐकून ६४ बायका होत्या. लढाई मध्ये चुकन आपला मृत्यू झाला. तर आपल्या बायका दुसऱ्या कुनासोबत तरी लग्न करतील ही कल्पना सुद्धा त्याला सहन झाली नाही. त्याने प्रताप गडावर शिवरायांच्या भेटीला येण्या पूर्वीच आपल्या सर्व बायकांना संपवण्याच्या निर्णय घेतला. त्या साठी त्याने विजापूर शहरापासून 5 किलोमीटर दूर असलेल्या एका निवांत जागेची निवड केली. त्या ठिकाणी त्याने ऐकून 64 कबरी खोदून घेतल्या त्या कबरीन पासून काही अनंतरावर पाण्याने भरलेली एक जुनाट विहीर होती. मोहिमेवर निघण्या अगोदरच त्याने आपल्या बायकांना पाण्यात बुडवून ठार केले आणि त्या कबरीनमध्ये दफन करुन टाकले. तिथे ऐकून 64 कबरी असल्या तरी विजापूर मधला हा भाग साठकबरीया ह्या नावाने प्रसिद्ध आजे अफजल खानाच्या या बायकांच्या कबरी आजही कर्नाटक मधल्या विजापूर जवळील साठकबर नावाच्या गावात अस्तित्वात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *