रेल्वे ही जनसामन्यांसाठी बीएमडब्लू किंवा मर्सिडीजचं आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. कमी खर्चामध्ये आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी योग्य वेळेमध्ये पोहचवण्याचे काम रेल्वे करते. चला तर जाणून घेऊया रेल्वे रुळांभोवती दगडी खडी का टाकलेली असते ? त्याची काही विशिष्ट उद्देश आहेत का ? जर आपणास आतापर्यंत हे लक्षात आले नसेल तर कदाचित या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला हि पोस्ट संपूर्ण वाचावी लागेल.
वास्तविक, जेव्हा ट्रेन रुळावर धावते तेव्हा ट्रॅकमध्ये कंपन तयार होतात आणि यामुळे ट्रॅक पसरण्याची शक्यता वाढते. ही दगडी खडी लाकडाच्या पट्ट्यांना जखडून ठेवते आणि लाकडाच्या पट्ट्या रूळाला जखडून ठेवतात…! ट्र्क पसरल्यावर रेल्वे रुळावरून घसरण्याची शक्यता असते. तसेच हवामान बदलण्याच्या वेळीही ट्रॅक पसरण्याची शक्यता असते, त्यामुळे कंपन कमी करण्यासाठी रुळांच्या कडेला दगडी खडी ठेवण्यात येते. त्यामुळे ट्रॅकच्या आसपास गवत किंवा झाडे लावली जात नाहीत.

ट्रॅकखाली लाकडी प्लेट ठेवण्याचे दुसरे कारण असे आहे की जेव्हा ट्रेन फिरते तेव्हा संपूर्ण भार ट्रॅक ऐवजी लाकडावर पडतो आणि आजूबाजूच्या दगडांमुळे, त्यास बरेच बळ मिळते जेणेकरून ते घसरत नाही.