चाणक्य नीती : यशस्वी होण्यासाठी या गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात…

चाणक्य नितीने भारताचा इतिहास बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून त्यांचे शब्दही आज तितकेच महत्त्वाचे आहेत. चाणक्य यांनी सांगितलेल्या १० निती खालीलप्रमाणे आहेत. ज्या तुम्हाला आयुष्यात यशस्वी बनवण्यास मदत करु शकतात. चला तर जाणून घेऊया चाण्यक्य नीती….

१) इतरांच्या चुकांमधून शिका, जर आपण स्वत:च्या चूकांमधून शिकत राहिला तर संपूर्ण ज्ञान घेण्यास तुमचे आयुष्य देखील कमी पडेल. २) काही लोक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करीत नाहीत. काही लोक आयुष्य जसे चालत ते तसेच जगत जातात. परंतु ज्यांना प्रगती करायची आहे, ज्यांना संकटातून वरती यायचे आहे – ते लोक सर्व काही पणाला लावण्यास घाबरत नाहीत. अशी देखील शक्यता असते की ते जिंकू नाही शकत, त्यांना काहीही भेटू शकत नाही परंतु ते काही तरी करून दाखवण्याचा प्रयन्त करत असतात. तोच सर्वांना आपण इतरांपेक्षा वेगळे असल्याची जाणीव करून देतो. ३) आपण भूतकाळाविषयी पश्चाताप करू नये आणि भविष्याबद्दल काळजी देखील करू नये. शहाणे लोक नेहमी वर्तमानकाळातच जगत असतात.

४) कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी स्वत: ला तीन प्रश्न नक्की विचारा – मी हे का करीत आहे, त्याचे काय परिणाम होऊ शकतात आणि मी यशस्वी होऊ शकेन……? आणि खोलवर विचार केल्यानंतर या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली, तरच पुढे जा. ५) एखादी व्यक्ती त्याच्या कृतीनेच महान बनते, आपल्या जन्मामुळे नाही…….!! ६) भीतीला जवळ येऊ देऊ नका, जर जवळ आली तर त्यावर हल्ला करा, म्हणजेच भीतीपासून पळ काढू नका आणि त्याला सामोरे जा ७) एकदा आपण एखादे काम सुरू केले की अपयशाची भीती बाळगू नका आणि त्यास सोडू नका. जे लोक प्रामाणिकपणे काम करतात ते नेहमी आनंदी राहतात.

८) आपण कायम आपल्या पातळीच्या वरील किंवा खाली असलेल्या लोकांना मित्र बनवू नका. ते तुम्हाला त्रासच देतील. केवळ आपल्याच लेवळचे मित्र सुखदायक असतात. ९) शिक्षण हा सर्वात चांगला मित्र आहे. सुशिक्षित माणसाला नेहमीच आदर मिळतो. शिक्षणाच्या शक्ती समोर युवाशक्ती आणि सौंदर्य दोन्ही कमकुवत आहेत. १०. कोणतीही व्यक्तीने खूप प्रामाणिक असू नये. सरळ झाडे आणि व्यक्ती नेहमी प्रथम कापले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published.