रेणू मंडलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे, हे आपणा सर्वांना ठाऊक आहेच, त्याचप्रमाणे हिमेश रेशमियाच्या आगामी चित्रपटाचेही तिने एक गाणे रेकॉर्ड केले आहे. तुम्हाला माहिती असेलच की काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेथे एक गरीब महिला कोलकता स्टेशनवर लता मंगेशकर यांचे ‘प्यार का नगमा’ गाणे गाताना दिसली होती. प्रत्येकजण तिच्या आवाजाने प्रभावित झाला. याला सोशल मीडियाची शक्ती म्हणा, ती स्त्री केवळ प्रसिद्ध झाली नाही तर, संगीत दिग्दर्शक-गायक हिमेश रेशमिया यांनी तिच्याबरोबर एक गाणे देखील रेकॉर्ड केले आहे.
हिमेश रेशमिया त्यांच्या आवाजामूळे खूप प्रभावित झाला आणि त्यांनी तिला आपल्या चित्रपटात गाण्याची संधी दिली, आज बॉलिवूडचा सुपरस्टार रेणू मंडल यांना त्यांच्या चित्रपटासाठी गाणे गायला सांगत आहेत. हिमेश रेशमियाच्या आगामी चित्रपटात रेणू मंडल यांनी त्यांचे तेरी मेरी कहाणी हे गाणे गायले गेले असून ते सोशल मीडियावर सर्वाधिक पाहिले जाणारे गाणे बनले आहे.

हिमेश रेशमियाने रेणू मंडल यांच्या पहिल्या गाण्यासाठी 6-7 लाख दिले होते पण रेणू मंडल हे पैसे घेत नव्हत्या, त्यानंतर हिमेश रेशमियाने त्यांना हे जबरदस्ती पैसे दिले आणि त्यांनी सांगितले की तूम्हाला बॉलीवूड सुपरस्टार होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. नुकतेच सलमान खानने असेही म्हटले आहे की, आपण रेणूचे गाणे आपल्या चित्रपटात ठेवू आणि त्या अक्षय कुमारच्या चित्रपटासाठीही गाऊ शकतात.
