गौतम गंभीरचे मोठे विधान, ‘कॅप्टन कोहली या दोन खेळाडूंशिवाय काहीच नाही…’

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. कर्णधार कोहलीच्या संघाने ग्रुप स्टेज मध्ये टॉप वरती राहत क्नॉक आऊट मध्ये प्रवेश केला. दरम्यान, कर्णधार कोहलीबद्दल टीम इंडियाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचे एक मोठे विधान समोर आले आहे.

गंभीर म्हणतात की कोहली त्यांना फलंदाज म्हणून आवडतो, पण कर्णधार म्हणून नाही. टीव्ही 9 इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, कोहलीला कर्णधारपदावर जाण्यासाठी अजून खूप वर्षे बाकी आहे.

विराट कोहली फक्त यांच्यामुळे चांगला कर्णधार आहे, कारण त्याच्यासोबत महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा आहेत, जर तो चांगला कर्णधार असता तर त्याने आतापर्यंत रॉयल चॅलेन्जर बेंगळुरला आयपीएलचे विजेतेपद जिंकले असते.

गंभीर पुढे म्हणाला की विराट कोहलीने बेंगलोर साठी आठ ते दहा वर्षे कर्णधारपद भूषवले आहे, परंतु आरसीबी बऱ्याच वेळा पॉइंट टेबलमध्ये आठव्या क्रमांकावर राहलेली आहे. एक फलंदाज म्हणून कोहली जगातील पहिल्या चार फलंदाजांमध्ये आहे, पण कर्णधार म्हणून विराट कोहली , धोनी आणि रोहित शर्मा यांच्यात खूपच फरक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.