कौन बनेगा करोडपती मध्ये आली एक व्यक्ती, चरण स्पर्श करून अमिताभ यांनी केले स्वागत…

” कौन बनेगा करोडपती ” मध्ये शुक्रवार दिनांक 11 मे ह्या दिवशी अशी व्यक्ती आली होती ज्यांचे स्वागत स्वतः महान नायक अमिताभ बच्चन यांनी केले. इतकेच नाही तर जेव्हा त्या स्टेजवर पोहोचल्या तेव्हा अमिताभ बच्चन त्यांच्या पाया पडले. आणि अमिताभ बच्चन यांनी त्यांना आदरपूर्वक ‘हॉट सीट’ वर बसवले. आता प्रश्न असा आहे की, ही व्यक्ती अखेर कोण आहे? तर ह्या आहेत सिंधुताई सपकाळ.

सिंधुताई सपकाळ एक सामाज सेविका आहेत. त्यांना अनाथांची आई म्हणतात. त्यांना आतापर्यंत राष्ट्रपती पुरस्कारा व्यतिरिक्त 750 पुरस्कार देण्यात आले आहेत. सिंधुताई सपकाळ ” ताई ” म्हणून ओळखल्या जातात, जेव्हा त्या रस्त्याच्या कडेला मुलाला रडताना , व तो अनाथ असल्यास ताई त्यांना दत्तक घेते. ‘Sony TV ‘ च्या Instagram वरती त्यांचा परिचय करून देत एक video सोडण्यात आला, ज्यामध्ये सिंधुताई सपकाळ सांगतात, मी मुलांना फक्त एवढेच सांगते की रडत – रडत हसायला शिका इथे कोणी एकटे नाही मी आहे तुमच्या सोबत तुमची आई…..!!!

महाराष्ट्रातील पुण्यामध्ये असलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्या छोट्या जगात सर्वांचे स्वागत आहे. त्या सर्वांना स्विकारतात ज्यांचे कोणी नसते त्यांना म्हणतात मी सर्वांसाठी आहे . सिंधुताई सपकाळ यांच्या विषयी त्यांच्या संस्थेचे लोक म्हणतात की त्यांनी आपल्या मुलांना किनारा करत अनाथ मुलांना दत्तक घेतले आहे, त्या आईबद्दल काय बोलावे. त्यांनी आमच्यासाठी किती केले आहे…!!!

70 वर्षांच्या सिंधुताई सपकाळन यांनी आत्तापर्यंत 1200 मुलांना आश्रय दिला आहे. परंतु असा प्रश्न पडतो की त्यांना इतका खर्च कसा परवडते. या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की मी खूप फिरते , दिवसभर भाषण देतो, मग कुठे लोक मदतीसाठी येतात. जेव्हब मी संध्याकाळी घरी परत येते तेव्हा सर्व मुले त्यांची वाट पाहत , की आई आली आहे अता ती आपल्याला खायाला देईल. सिंधुताई सपकाळने आयुष्यातील अनेक टप्पे पाहिले आहेत. त्या विषयी उल्लेख करत केबीसी च्या मंच्यावर अमिताभ बच्चन यांनी सिंधुताई सपकाळ यांना एक दिलचस्प प्रश्न विचारला. त्यांनी विचारले की तुम्ही फक्त गुलाबी साडी नेसता असे ऐकले आहे. या मागील कारण काय आहे….? सहजपणे या प्रश्नाचे उत्तर देत सिंधुताई सपकाळ यांनी आपला पदर अमिताभ बच्चन यांच्याकडे दाखवत म्हणाल्या ” मी माझ्या आयुष्यात इतका काळोख पाहिला आहे की आता काहीतरी गुलाबी राहू दे “. हे उत्तर ऐकून केबीसीच्या मंच्यावर टाळय़ांचा कडकडाट झाला.

अमिताभ बच्चन यांनी सिंधुताई सपकाळ यांना अनेक प्रश्न – उत्तरे विचारत असताना त्यांना वैयक्तिक जीवनाशी संबंधित एक प्रश्न विचारला, तुमच्याशी कित्येकजण वाईट वागले, काय तुम्ही त्या सर्वांना क्षमा केले. यावर सिंधुताई सपकाळ म्हणाल्या, सर्व प्रथम मी माझ्या पतींना क्षमा केले. सासरच्यांनी मला दगड मारून घराबाहेर काढले पण त्यांनी मला घराबाहेर काढले म्हणूनच तर मी येवढी मोठी झाले, इथपर्यंत पोहोचू शकले…! नंतर जेव्हा त्यांना माझ्याकडे यायचे होते तेव्हा मी म्हणले , आता मला पत्नी बनून राहायचे नाही , तुम्हाला लहान मूल बनून यायचे असेल तर पहा..! सिंधुताई सपकाळ ह्यांची ही दिलेरी पाहून अमिताभ बच्चनही टाळ्या वाजवताना दिसले.

सिंधुताईंना त्यांच्याच लोकांनी नाकारले. पण आज त्याचे कुटुंब खूप मोठे आहे. त्यांना 207 जावाइ, 36 सूना आणि 1000 हून अधिक नातवंडे आहेत. आजही त्या आपले काम नॉन-स्टॉप करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.