दुबईबद्दल या विचित्र गोष्टी तुम्हाला तुम्हाला माहिती नसतील…

दुबई हे जगातील सुंदर शहरांच्या पैकी एक शहर आहे. दुबईची उंच इमारती, संपत्ती, प्रसिद्धी, कठोर कायदा इत्यादी जगभरात प्रसिद्ध आहेत. चला दुबईविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया…

१) सर्वप्रथम, बोलूया जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खालीफा बद्दल, ह्या इमारतीत 164 मजले आहेत आणि हिची लांबी सुमारे 800 मीटर आहे. ही इमारत आपण 90 कि.मी. अंतरावरून देखील पाहू शकतो. २) या शहरात क्राइम 0% आहे, म्हणूनच ह्यास जगातील सर्वात सुरक्षित देश मानला जातो. ३) या शहरात घरामध्ये दारू ठेवण्यासाठी Licence असणे आवश्यक आहे. Licence शिवाय घरामध्ये दारू पिण्याची परवानगी मिळत नाही. ४) इथल्या पोलिसांकडे लॅम्बोर्गिनी, फेरारी आणि बेंटले अशा गाड्या आहेत.

५) जगभरातील देशांमध्ये लोकांना income tax भरावा लागतो, दुबईत असे काही नाही. इथल्या लोकांना income tax भरण्याची गरज नाही. ६) या शहरात जगातील सर्वात मोठे शॉपिंग सेंटर आहे, जिथे 1200 हून अधिक स्टोअर्स आहेत. ७) इथे लग्नाआधी स्त्री-पुरुषांमध्ये संबंध ठेवणे बेकायदेशीर आहे. जर कोणी असे करताना पकडले गेले तर त्याला अटकेनंतर हद्दपार केले जाते. ८) या शहरात काही अशी एटीएम आहेत ज्याच्यातून सोन्याची नाणी बाहेर येतात.

९) 1960 पर्यंत येथे पाहण्यासारखे काही नव्हते परंतु आता ह्या शहराला जगातील श्रीमंत देशांच्या यादीमध्ये मोजले जाते. १०) येथील लोक पाळीव प्राणी म्हणून कुत्रे आणि मांजर पाळत नसून सिंह आणि चित्ता पाळणे पसंत करतात. ११) येथे A.C फक्त इमारतींमध्येच नाही तर बसस्थानकातही बसविण्यात आले आहेत. १२) येथील मूळ रहिवाशांची संख्या ही एकूण लोकसंख्येपैकी केवळ 17 टक्के आहे, बाकीची 73 टक्के लोकसंख्या भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि इतर युरोपियन देशातील आहे.

१३ ) जगातील सर्वात महागड्या गाड्या दुबईत आहेत. १४) या शहरात हॉर्न वाजवला जात नाही, प्रत्येकजण व्यवस्थित नियम पाळत पुढे जातो. त्यामुळे दुबईच्या रस्त्यावर ध्वनी प्रदूषण होत नाही. १५) येथे पुरुषांसाठी शेख आणि महिलांसाठी शेखा हे नाव ठेवले गेले आहे. १६) कोल्ड्रिंक येथे पाण्यापेक्षा स्वस्त उपलब्ध आहेत. १७) दुबईमध्ये सोन्याचा व्यापार खूप जास्त आहे, दुबईतील लोक सोन्याचे खूप चाहते आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.