हकीम या व्यक्ती जवळ सापडले चक्क 10 हजार विंचू, जाणून घ्या त्यांच्याबरोबर काय करत होता तो…

आजही आपल्या देशात औषध आणि आयुर्वेदिक उपचारांच्या नावाखाली प्राण्यांच्या अवयवांचा वापर केला जात आहे. ज्यामुळे त्यांची पूर्णपणे तस्करी होत आहे., नुकताच अजमेरमध्ये शरीरे दुखणे, डोकेदुखी, सर्दी होणे ,या आजारांवर विंचू च्या तेलाने उपाय करणाऱ्या हकीम ला वनविभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की या हकीम जवळ सुमारे 10,000 विंचू सापडले आहेत. कारवाई दरम्यान या दुकानातून 10 हजार मृत विंचू आणि 60 लिटर कथित विंचू तेल आणि इतर साहित्य जप्त केले.

वनविभागाचे रेंजर महानलाल सांभरिया म्हणाले की, अंतर्गत कोट क्षेत्रात एक व्यक्ती विंचूचे तेल विकत असल्याची तक्रारी येत होती, की त्याच्याकडे विंचू मोठ्या प्रमाणात आहेत. या माहितीनंतर पुष्करचे प्रादेशिक वन अधिकारी विजय कुमार टेलर यांच्या नेतृत्वाखाली रेंजर सुधीर माथूर यांच्याशिवाय महानलाल सामरिया, दर्गा पोलिस ठाण्यात 30 हून अधिक पोलिसांचा सहभाग होता. दुकानाची माहिती देणारा अरप्पा आणि विंचू याची खातरजमा करताच या पथकाने त्वरित तेथे छापा टाकला आणि त्याला अटक केली.

कसे बनवत होता विंचूचे तेल

तज्ञ लोक म्हणतात की तेल काढण्यासाठी विंचू गरम करतात. काही काळानंतर, विंचूचा मेंदू बाष्पीभवन होतो आणि वरील झाकणास चिकटते. यानंतर ते थंड होण्यास ठेवले जाते. थंड झाल्यानंतर विंचूचा मेंदू पुन्हा द्रवरुपात होतो. तेल काढल्यानंतर उर्वरित विंचू,चमेली आणि इतर तेलांना मिक्स करून उकळले जाते.

This image has an empty alt attribute; its file name is PicsArt_08-23-09.31.29.jpeg

Leave a Reply

Your email address will not be published.