प्लास्टिकच्या बोटल्सपासून बनविलेले चक्क घर, पाहिल्यावर विश्वासच बसणार नाही…

एकेकाळी उपयोग असणारं प्लॅस्टिक जगासाठी शाप असल्याचं समोर आलंय. तो आता मानवासाठी भस्मासूर म्हणून समोर आलाय.अक्षरश्या नाशवश असणाऱ्या या प्लॅस्टिक ची विलेवाट कशी लावायची असा प्रश्न जगासमोर आहे. मात्र याच प्लॅस्टिक च्या बोटल मुळे तिचा अफलातून वापर करून अमरावती येथील एका इंगजनीअर ने अफलातून घर बांधले आहे. या साठी एक दोन नव्हे तर तब्बल 16 हजार पेक्षा जास्त बाटल्यांचा वापर करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे पारंपारिक पद्धतीने बनणाऱ्या घरापेक्षा या बाटलीच्या घराला 30 ते 35 टक्के खर्च कमी आलाय. लग्न करावं बगून आणि घर पाहावं बांधून अशी म्हण आहे. आजच्या इंटरनेट आणि मोबाईल च्या काळात लग्न जमन सोप आहे परंतु,घर बांधन तितकच कठीण आहे.कारण जमिनीच्या किंमती पाहून त्यामध्ये सिमेंट,विटा,सळ्याच्या किमती पाहून सर्वसामान्य माणसाला घर बांधन अवघड होतं चाललं आहे. मात्र यावर एक तोडगा निघाला आहे असं म्हंटले तरी चालेल.

अमरावती जिल्ह्यातील उजगावकर कुटुंबानं घर बांधताना आगळा वेगळा प्रयोग केला आहे. त्यांनी घर बांधताना चक्क प्लॅस्टिक बाटलींचा वापर केला आहे. आणि आता हे घर पूर्ण झालं आहे. ते घर इतर पारंपरिक घरासारखं मजबुत आहे. शिवाय भूकंप रोधक आणि अग्नी रोधक सुद्धा आहे, अस उजगावकर कुटुंब दावा करतात.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे घर बांधताना 30 ते 35 टक्के खर्च वाचला आहे. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या प्रयोगाने अनेक गोष्टी साध्य झाल्या आहेत. एक तर कमी खर्चात मजबुत घर बनलेच आहे. पण यामध्ये प्लॅस्टिक चा वापर झाल्याने पर्यावरणाचं होणारे नुकसान सुद्धा टळले आहे. हा प्रयोग झाल्याने प्लॅस्टिक चा तोडगा निघाला अस म्हणता येईल. मात्र या प्रयोगाकडे शासनाने सुद्धा प्रामाणिक पणे लक्ष्य द्यायला हवं. एक मात्र नक्की हा आगळा वेगळा प्रयोग खरच नावाजण्यासारखा आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा याचा विचार करायला हवा. अस म्हणता येईल.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.