मित्रानो प्रत्येकाला वाटत आपलं पॉकेट भरलेलं असावं. म्हणजे पैसा हा प्रत्येकाच्या आयुष्यात आवश्यक असतो. पैसा पॉकेट मध्ये असेल तर आपल्या मनाला समाधान वाटत आणि बिना पैसे शिवाय आयुष्यात कोणताही सुख मिळत नाही. पण बऱ्याच व्यक्तींना अस होत की, सकाळी पॉकेट भरलेलं असत आणि संध्याकाळ पर्यंत ते रिकामी होत. अस का होत? आपल्या कडे तो पैसा का ठिकत नाही? तर आज आपण पाहणार आहोत की पॉकेट कायम भरून राहण्यासाठी काही तोडके असतात.
मित्रांनो आपल्या पॉकेट मध्ये पैसा भरून राहण्यासाठी पहिली गोष्ट आहे एक 21 तांदूळ, तर आपण हे 21 तांदूळ पुडी बांधून आपल्या पॉकेट मध्ये व्यवस्थित ठेवायचे आहे. या ने काय होत अन्न जसे कणाकणाने वाढते तसेच आपले पैसे देखील कणाकणाने वाढतात. ज्यांच्या पॉकेट मध्ये लक्ष्मी असते जर त्यांच्या पॉकेट मध्ये आपण तांदूळ ठेवले तर आपले पैसे वाढण्यास व पैसे टिकून राहण्यास मदत होते. दुसरं आहे मित्रानो पिंपळाचे पान,जर आपण पिपळाचे पान आपल्या पॉकेट मध्ये ठेवले तर आपले पैसे नेहमी ठिकून राहतील आणि वाढत राहतील. तिसरी गोष्ट आहे कवडी,जर आपण कवडी आपल्या पॉकेट मध्ये ठेवली तर आपले पैसे वाढण्यास निश्चित मदत होईल. मित्रांनो त्यानंतर येतो चांदीचा सिक्का,चांदी किव्हा सोन्याचा सिक्का आपल्या पॉकेट मध्ये ठेवायचा आहे त्यावर विधी करून ठेवलेला असावा आणि तो ठेवताना काळजी घ्यावी की तो चकूनही पडू नये. पडले तर आपल्यावर दुर्भाग्य येऊ शकते.
त्यानंतर येत रूद्राक्ष मित्रांनो रुद्राक्ष पॉकेट मध्ये ठेवण अत्यंत सोईचे असते. छोट्या साईझ मध्ये जर रुद्राक्ष पॉकेट मध्ये ठेवला, तर तुमच्यावर लक्ष्मी देवतेची कृपा होते आणि तुमच्या पॉकेट मध्ये पैसा नेहमी टिकून राहतो. अजून एक गोष्ट अशी की आपले आई वडील आपल्याला पैसे देतात, खर्चण्यासाठी किव्हा इतर कामांसाठी, सहज म्हणून दिलेला तो जर पैसा तुम्ही तुमच्या पॉकेट मध्ये व्यवस्थित सांभाळून ठेवला. तर तुमचा पैसा कायम ठिकण्यास मदत होते. तो पैसा खर्चायचा नाही. जो बक्षीस म्हणून दिलेला पैसा असतो तो कधीही खर्चायचा नसतो. तो पॉकेट मध्ये तसाच ठेवायचा. तो पैसा इतर पैसे ला टिकविण्यास व वाढवण्यास मदत करतो. त्यानंतर जे आपण पैसे पॉकेट मध्ये ठेवतो ते सरळ ठेवावे घडी मारून ठेवू नये, किव्हा त्यांचे कोपरे दुमडलेले नसावेत, यामुळे लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होते आणि रुष्ट झाल्यामुळे आपल्या पॉकेट मध्ये पैसा शिलक राहत नाही. त्यानंतर तुम्ही जर महालक्ष्मी चा फोटो जरी पॉकेट मध्ये ठेवला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल.