जगातील सर्वात पहिले घड्याळ, जाणून घ्या त्याची किंमत…

जगातलं पाहिलं घड्याळ सापडलं या घड्याळाचा 1987 पासूनचा प्रवास एका सिनेमाच्या कथे पेक्ष्या कमी नाही. घड्याळ आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे.जिच्या शिवाय आपले पान सुद्धा हलत नाही. घरी असो अथवा ऑफिसमध्ये वाचनालयात असो अथवा स्टेशनवर किव्हा देशात असो अथवा विदेशात घड्याळ लागते म्हणजे लागतेच…मग ते प्रत्येक वेळेस आपल्या हातात असो असे काही नाही, भिंतीवरती का असो पण ते पाहिजेच. तिचे महत्व आज आपण जाणून घेणार आहोत.

एक काळ असा होता जेव्हा लोग सूर्याच्या मदतीने वेळेचा अंदाज लावायचा. पण ऋतू मागे सूर्य सुद्धा मागे पुढे व्हायचा त्या मुळे अंदाज येत नसे. म्हणून कोणत्याही ऋतूत वेळ समजण्यासाठी शोध लागला तो घड्याळाचा…त्या दिवसापासून आज पर्यंत घड्याळ आपली अत्यावश्यक गोष्ट झाली आहे. वेळे नुसार घड्याळाचा रंग,रूप,आकार बदलत गेला पण घड्याळाचे महत्व आज देखील तितकेच आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जगातील पहिले घड्याळ कसे असेल? ते कसे दिसत असेल आजच्या घड्याळाच्या तुलनेत काय बदल होते. हे सर्व जाणून घ्यायचं असेल तर हा लेख आहे फक्त तुमच्यासाठी…

एक संशोधन वेळी पोमेंडन नावच घड्याळ मिळाले आहे. त्याला जगातील पहिले घड्याळ असण्याची मान्यता मिळाली आहे. जर्मनीच्या नूरणबुर्ग मध्ये या घड्याळाच्या मुल्यांकन करणाऱ्या एका कंमपणीने सांगितलं आहे की सफरचंद सारख हे घड्याळ जगातील सर्वात पहिले घड्याळ आहे. या घड्याळाचा प्रवास एका सिनेमातील कथेपेक्ष्या कमी नाही. १९८७ मध्ये लंडन मध्ये एक घड्याळ बनवणाऱ्या युवकाने एक जुन्या पुरण्या वस्तूंच्या बाजारातून 10 pounds खर्च करून एक बॉक्स घेतला होता. त्या बॉक्स मध्ये त्याला काही घड्याळाचे तुकडे आणि काही भाग मिळाला आणि त्याच बॉक्स मध्ये त्याला हे घड्याळ मिळाले. खरं ते या घड्याळाच महत्व त्याला कळालेच नाही. मुळात हे घड्याळाच असावे का हेच त्याला समजलं नसावं. म्हणून त्याने 2002 मध्ये हे घड्याळ अगदी शुल्लक किमतीत एका इसमाला विकून टाकलं. आणि त्याने देखील एका दुसऱ्या युवकाला विकून टाकलं.त्या व्यक्तीने मात्र त्याला ते घड्याळ रिसर्च करायला ठेवलं. शेवटी ह्या घड्याळाला त्याची खरी किंमत मिळाली. 10 pounds मध्ये खरेदी केलेले ह्या घड्याळाची किंमत आज गगनाला भिडली आहे.

जर त्या युवकाला या घड्याळाची किंमत काय आहे याची कल्पना जरी असती, तर आज तो करोड पती झाला असता. हे घड्याळ पितळ,आणि सोन्यापासून बनवण्यात आले आहे. त्याच्या आतल्या बाजूला MDBP आणि N ही अक्षरे लिहिलेली आहेत. तदन्यांच्या माहिती नुसार हे घड्याळ १५०५ मध्ये बनवण्यात आलं होतं. घड्याळाचे जनक पीटर हेनरी यांचा जन्म १४८०-१४८५ या दरम्यान झाला होता. या घड्याळाच्या ph ला सामान्य पद्धतीत पाहता येत नाही. त्या साठी सूक्ष्मदर्शकाची गरज पडते. आजच्या काळात या घड्याळाची किंमत म्हणजे भारतीय चालनानुसार याची किंमत 300 ते 397 कोटी रुपये इतकी आहे. हे घड्याळ कोणी बनवलं हे ठाम पनी अजून कोणी सांगू शकल नाही. तर तुम्हाला काय वाटत या वर नक्की कंमेंट करून कळवा…

Leave a Reply

Your email address will not be published.