या कारणामुळेच काजलने वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी केले होते अजय देवगणशी लग्न.

काजलचा जवळचा मित्र मिकी कॉन्ट्रॅक्टर यांनी अजय देवगन आणि काजलच्या love story विषयी काही धक्कादायक खुलासे केले. मिकी म्हणाले की मला विश्वासच बसत नाही काजल अजयशी लग्न करू शकेल. आता काजलने त्या बिषयी खुलासा केला आहे की, का तिने अजय देवगनबरोबर सात फेरे घेतले. हे कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

मिकीने एका चैट शो च्या दरम्यान सांगितले की, ‘काजलने मला प्रथम अजय देवगणबद्दल सांगितले तेव्हा मला धक्का बसला. मला अजय नीट माहित नव्हते. कदाचित आता मी त्याला थोडे चांगले ओळखतो. माझा यावर विश्वास बसत नव्हता. कारण काजल आणि अजय या दोघांचा स्वभाव खूप वेगवेगळा आहेत, मला वाटते की म्हणूनच कदाचित दोघे एकमेकांना आवडले असावेत.. ‘

पण काजलला वाटते अजयशी लग्न करण्याचा योग्य निर्णय घेतला ती म्हणते, ‘मला वाटतं की त्यावेळी मी योग्य निर्णय घेतला. मी 9 वर्षे चित्रपटात काम केले होते. मी चित्रपटसृष्टीत स्वत: ला सिद्ध केले. त्यावेळी मी वर्षाला चार ते पाच चित्रपट करत होतो. मला माझं करिअर असेच पुढे ओढत न्हेता येणार नाही. म्हणून मी लग्न केले आणि लग्न झाल्यावर मी वर्षामध्ये फक्त एकच चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. मी आनंदी रहावे आणि माझ्या कुटुंबालाही पूर्ण वेळ देता यावा. हेच सर्व तर मला हवे होते.

काजलने सांगितले की ती अगदी ‘कुछ कुछ होता है’ च्या अंजलीसारखी आहे. ती अंजलीसारखी टॉमब्वॉय होती. त्यांना आज देखील माहीत नाही की ते कोणते कपडे घालणार आहेत. अंजलीने मेकओवर केले होते, जुन्या काजल आणि लग्ना नंतरची काजल पाहिल्यास तुम्हाला कळेल की तिने ही मेकओवर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.