वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलने असे सांगितले की, ‘मी संन्यास घेण्याची घोषणा केलेली नाही. पुढील घोषणा होईपर्यंत मी संघामध्येच राहील. वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा फलंदाज ख्रिस गेल, क्रिकेट चाहत्यांच्या नजरेत स्वत: ला खराब करत आहे. ख्रिस गेल अश्या अवस्थेत आहे की, त्यांच्या या वयात तो पूर्वीसारखा खेळूच शकत नाही. पण पुन्हा एकदा ख्रिस गेलने आपल्या Retirement ची बातमी खोटी असल्याचे सिद्ध केले आणि सांगितले की तुम्ही आता थांबा मी याबद्दल नंतर माहिती देईन.
ख्रिस गेल स्वत: वर्ल्ड कप 2019 च्या आधी म्हणाला होता की, या वर्ल्ड कपनंतर क्रिकेटला निरोप देणार. त्यानंतर वर्ल्ड कपदेखील सुरू झाला आणि तो संपण्यापूर्वी काही वेळात त्याचे विधान आले की, ख्रिस गेलला टीम इंडियाविरूद्ध कसोटी मालिका खेळायची होती, परंतु निवड समितीने त्याला संघात निवडले नाही. यानंतर आपण संन्यास घेऊ असेही त्यांनी नमूद केले.

गेलला सन्मानपूर्वक निरोप मिळावा अशीही वेस्ट इंडीज बोर्डाची इच्छा आहे. पण इथेसुद्धा गेलने पलटी मारली आणि आपल्या नेहमीच्या सुप्रसिद्ध असणाऱ्या स्टाईल मध्ये हसून Retirement च्या बातमीला नकार दिला. गेलनेही प्रत्येकाचे अभिवादन स्वीकारले आणि पॅव्हिलियन ला परत जात असताना त्याने ब्याट ला हेल्मेट लावत काही संकेत दिले. काय हे सर्व गेलने गम्मत म्हणून केले जसे तो कधीच करत नाही. पण आता त्यांनी Retirement ला नकार दिला.

तरी, गेल त्याच्या Retirement साठी कोणत्या गोष्टीची वाट पहात आहे, हे समजणे कठीण आहे. गेल जवळजवळ 40 वर्षांचा आहे आणि आता वयाचे परिणाम त्यांच्या खेळात स्पष्टपणे दिसून येतो. गेलने क्रिकेटमध्ये बरेच records केले आहेत. कसोटी क्रिकेटमधील तिहेरी शतक, एकदिवसीय क्रिकेटमधील दुहेरी शतक, तसेच टी -२० मध्ये शतक झळकावणारा तो जगातील पहिला फलंदाज आहे. वेस्ट इंडीज कडून सर्वाधिक वनडे खेळणारा खेळाडू, सर्वाधिक वन डे धावा बनवणारा, सर्वाधिक वनडे शतके, वनडेमधील सर्वाधिक षटकार असे बरेच record त्यांचे आहेत. तो वेस्ट इंडीजकडून 300 हून अधिक वन डे सामने खेळणारा खेळाडू बनला आहे. याशिवाय गेलच्या नावावर बरेच रेकॉर्डर आहेत. गेल हा एक महान क्रिकेटपटू असल्याचे म्हटले जाते, परंतु ज्याप्रकारे तो वारंवार Retirement घेण्याविषयी बोलतो आणि नंतर त्या गोष्टी वरुन पलटी मारतो. त्याच्या ह्या प्रकारामुळे त्यांची प्रतिमा खराब करत आहेत.
गेलने काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, मला आणखी पाच वर्षे खेळायचे आहे, ज्यावर वेस्ट इंडीजच्या काही माजी खेळाडूंनी असे म्हटले होते की गेलच्या या गोष्टी मूर्ख आहेत आणि ते आपले मोठेपण गमावत आहेत.