तुम्हाला माहिती आहे का ? देशातील सर्वात धोकादायक ब्लॅक कॅट कमांडोचा महिनाभराचा पगार किती आहे!

आपल्या देशात काळ्या रंगाचे कपडे घातलेले कमांडोना ब्लॅक कॅट कमांडो असे म्हणतात. मुळात ते नॅशनल सिक्युरिटीचे गार्ड असतात जे गडद काळे कपडे घालतात. एनएसजी ची स्थापना सन 1984 मध्ये झाली होती. ते देशातील सर्वात प्रशिक्षित आणि ट्रेनिंग प्राप्त कमांडो आहेत. त्यांच्या प्रशिक्षणाबद्दल सांगायचे तर, ते खूप कठीण असते. म्हणून आपण आज ब्लॅक कॅट कमांडोच्या पगाराबद्दल बोलणार आहोत.

ब्लॅक कॅट कमांडोच्या पगाराबद्दल बोलायचे तर, त्यांच्या पगाराची सुरवात 84 हजार पासून सुरू होते, आणि दरमहा अडीच लाख रुपयांपर्यंत जातात. त्यांना सरासरी दीड लाख रुपये मिळतात. यानंतर त्यांना बर्‍याच सुविधा आणि भत्तेही दिले जातात. या क्षेत्रातील बहुतेक लोक 10 वर्षानंतर इतर पदांवर जातात. त्यांना रँक आणि अनुभवानुसार उच्च पगारही मिळतो.

एनएसजी कमांडो किंवा ब्लॅक कॅट कमांडो व्हीव्हीआयपी लोकांची सुरक्षा करतात. याशिवाय त्यांना दहशतवादी हल्ल्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी त्यांना पाठविले जाते. त्यांच्या काबिलियत आणि क्षमतेचे जेवढे कौतुक करेल तेवढे कमीच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.