सियाचीनमध्ये भारतीय जवान कसे राहतात, हे जाणून घेतल्यावर तुम्हाला धक्काच बसेल…

सियाचीन हे जगातील सर्वोच्च रणांगण आहे, जिथे भारतीय सैनिक आपल्या मातृभूमेचे संरक्षण करण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता उभे आहेत, तिथले जीवन किती कठीण आहे ह्याचा अंदाज ह्या घटने वरून बांधला जाऊ शकतो की मागील 30 वर्षांत आपल्या 846 जवान शहीद झाले.. अत्यंत धोकादायक हवामान असूनही, देशातील 10,000 सैनिक दिवसरात्र या बर्फवृष्टीच्या शिखरावर आपला ठिया मांडून राहिले आहेत. शत्रूंच्या आपल्या देशाबद्दल असणाऱ्या प्रत्येक वाईट योजना अयशस्वी करत आहेत.

सियाचीन ग्लेशियर हे 20 हजार फूट उंचीवर आहे. येथे सैनिक Group मध्ये जातात. Group मध्ये चालत असलेल्या जवानांचे पाय एका मोठ्या दोरीने बांधले जातात जेणेकरून कोणताही सैनिक पडला किंवा त्याचा पाय घसरला तरी तो Group पासून वेगळा होऊ नये. जेथे सैनिक तैनात करायचे आहेत. त्या उंचीवर पोहोचण्यासाठी सैनिकांना बेस कॅम्पच्या 10 दिवस आधी प्रवास सुरु करावा लागतो. यासाठी सैन्य रात्री अडीच किंवा साडेतीन वाजता सुटते जेणेकरून 9 वाजण्या अगोदर तिथपर्यंत पोचता येईल. सैन्य ज्यास्तीत ज्यास्त रात्रीचाच प्रवास करतात कारण दिवसभरात बर्फ कमी होण्याचा धोका जास्त असतो.

प्रत्येक सैनिकांसोबत 20-30 किलोची बॅग असते ज्यात एक बर्फ कापण्याची कुऱ्हाड, तसेच आणखी काही हत्यारे आणि दररोजच्या लागणाऱ्या काही वस्तू असतात. शून्यापेक्षा कमी तापमान असूनही, सैनिकांना घाम फुटतो कारण शरीरावर 6-7 पट जाड आणि उबदायी कपडे असतात. सैन्य चौकीवर पोचल्यावर सैन्याच्या शरीरावर आणि कपड्यांमध्ये घामाचा पातळ थर जमा होतो..

अन्नामध्ये लिक्विडचा जास्त वापर केला जातो. खान्याच्या वस्तू ह्या स्टील च्या भांड्यातून पुरविल्या जातात. जर तिथे सूप पिण्याची इच्छा असेल तर प्रथम तो वितळावा लागतो. स्टील चा कॅन देखील गोठलेले असतो म्हणून त्याला अगोदर जाळावरती धरून गरम करावा लागतो आणि सूप वितळताच, तो जेवढ्या भरभर जमेल तेवढ्या लवकर तो प्यावा लागतो. कारण तिथले शून्यापेक्षा ही कमी असणारे तापमान त्या सूप ला लगेच बर्फ बनवून टाकते

तिथल्या हवामानाची परिस्तिथी अशी आहे की तेथील तापमान थोड्याच वेळात 0° पेक्षा -60° पर्यंत खाली जाते आणि हिमवादळ अशा प्रकारचा आहे की डोळ्यांची उघडझाप करण्या अगोदरच तिथला Group नाहीसा होऊ शकतो.

सैनिकांना पाणी पाण्यासाठी स्वतंत्र सुविधा नसते कारण जवानांना बर्फ वितळूनच प्यावा लागतो. तसेच त्यात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण बर्फ देखील दूषित असू शकतो. सैनिकांना तिथे जेवणाची खूप मोठी समस्या आहे, परंतु जगण्यासाठी काहीतरी खावे लागेल. त्यात गरम आणि थंड पदार्थांचा त्रास अधिक आहे. गरम अन्न आणि सूप हे थंड होण्याआधी खावावे लागतात, ज्याचा परिणाम सैनिकांच्या अन्न पचनावर होतो. म्हणून, एक निरोगी सैनिक देखील शौचालयात 2-3 तास घेते.

आंघोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याबरोबर देखील संपूर्ण काळजी घेतली जाते. आंघोळ करताना पाणी गोठले जाऊ नये , म्हणून ते सतत स्टोव्हवर गरम केले जाते. केरोसीन तेल ( रॉकेल ) हे तेथील एक lifeline म्हणून आळखले जाते कारण सर्व काही त्यावर अवलंबून असते. पूर्वी ते कॅनमधून पुरवले जात होते, परंतु आता पाइपलाइन टाकली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.