मित्रांनो तुम्ही कोणत्याही मंदिरात जा तुम्हाला तिथे दिसेल की काही जण नारळ फोडतात पण तिथे फक्त पुरुषच असतात. स्त्रिया ,महिला चुकूनही नारळ फोडत नाहीत. बऱ्याचदा आपण असेही पाहतो की, मंदिराचे जे पंडीत असतात तेच नारळ फोडण्याचे काम करत असतात, स्त्रीया या तुम्हाला नारळ फोडताना दिसत नाहीत. मित्रांनो हिंदु धर्मामध्ये कोणत्याही पुजेसाठी श्रीफळाचे विशेष असे महत्व आहे. तुम्ही कोणत्याही देवी देवतेची पूजा करा, त्या पुजे मध्ये नारळ आवश्यक असतोच. नारळा शिवाय पूजा अपुरी मानली जाते. असे मानण्यात येते की नारळ चडवण्याने आपल्या आयुष्यातील पैश्याच्या समस्या, धनाच्या समस्या दूर होतात.
नारळाचं मोठे महत्व आहेच, या फळाला श्रीफळ असे म्हटले जाते. मात्र हिंदू धर्माने स्त्रियांना नारळ फोडण्यास अधिकार दिला नाही. शास्त्रनुसार स्त्रियांनी नारळ फोडणे अशुभ मानले जाते. तुम्हाला हे ऐकून अच्यार्य वाटेल, आणि काही जणांना राग सुद्धा येईल, सहाजिकच आहे स्त्री वर्गाला या विषयी वंचित ठेवण्यात आले आहे. या प्रकारची एक भावना असेल सुद्धा मात्र एक कथा या मागे प्रचलित आहे. ही कथा अशी आहे की, जे ब्रम्हरुपी विश्वा मित्र होते त्यांनी या विश्वाची निर्मिती केली. मात्र हे विश्व निर्माण करण्यापूर्वी ब्रम्हरुपी विश्व मित्र यांनी नारळाची निर्मिती केली होती. म्हणूनच या नारळाला मानवच प्रतीक मानले जाते.

नारळ हे बीज रुपी असल्यामुळे ते प्रजलन क्षकमतेशी जुळलेले असतात. म्हणजेच आपली जी प्रजलन क्षमता असते आपण प्रजलन करून जी उत्पत्ती करतो अगदी त्याच्याही आपला संबंध आहे. आपल्याला माहीत असेल की स्त्रिया या बीज रूपातच बाळाला जन्माला घालतात आणि म्हणूनच हिंदू धर्म शास्त्राने स्त्रियांना नारळ फोडण्याचा अधिकार दिलेला नाही. तर तुम्हाला आता कळलेच असेल की नारळ फक्त पुरुषच का फोडतात.