आपण आपल्या आवडत्या क्रिकेटपटुंना केवळ त्याच्या नावानेच ओळखत नाही तर, त्यांना त्याच्या नंबर वरुण देखील ओळखता. मैदानावर उतरणारा प्रत्येक खेळाडू एका विशिष्ट नंबर घेऊन खाली उतरतो. प्रत्येक खेळाडूच्या जर्सीवरील नंबर मागील रहस्य जाणून तुम्हाला खुप आश्चर्य वाटेल. तो नंबर त्यांना कसा मिळतो तुम्हाला काय वाटतंय? जर आपणास आतापर्यंत माहित नसल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की या जर्सीवरील नंबरमागील रहस्य काय आहे. जरी हा नंबर संघ व्यवस्थापन देत असले तरी, परंतु खेळाडू कोणतीही संख्या घेण्यास पूर्णपणे मोकळे आहेत. जर तो नंबर इतर कोणत्याही प्लेयरकडे नसेल तर. प्रत्येक खेळाडू हा नंबर त्यांच्या आवडीनुसार घेतो, म्हणूनच वीरेंद्र सेहवागच्या टी-शर्टवर तुम्हाला एकही नंबर पाहायला मिळणार नाही. अशा काही खेळाडूंच्या नंबर चे कारणे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सचिन तेंदुलकर- 10 नंबर हा सचिनच्या जर्सीच्या मागील बाजूस लिहिलेला आहे. याचे मागे कोणतेही खास कारण नाही, परंतु एकदा एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सचिन म्हणाला की, त्यांच्या नावांमध्ये “10” येते, ‘ten’ dulkar म्हणून त्याला 10 नंबर ची जर्सी आवडते.

महेंद्र सिंह धोनी- धोनीने 7 नंबरची जर्सी घातली आहे. कारण, धोनीचा जन्म “7” तारखेला झाला आहे. याशिवाय धोनीसाठी 7 नंबर खूप लकी आहे.

विराट कोहली- विराट कोहलीची जर्सी नंबर 18 आहे.त्यामागे आहे एक खास कारण.विराट कोहलीच्या वडिलांचे 18 डिसेंबर रोजी निधन झाले. त्यावेळी स्वत: विराट कोहली सुद्धा 18 वर्षांचा होता, म्हणून जेव्हा जेव्हा नंबर घ्यायचा असतो तेव्हा तेव्हा तो “18” नंबर घेतो.

युवराज सिंह- युवराज चा जर्सी नंबर 12 आहे.खरं तर युवराजशी 12 नंबरचे अनेक कनेक्शन आहेत. त्याचा जन्म १२ तारखेला आणि १२ व्हा महिन्यात झाला होता. इतकंच नाही तर त्याचा जन्म चंदीगड मधील सेक्टर 12 मध्ये झाला होता.
