आजपर्यंत तुम्ही बर्याच तुरूंगांविषयी ऐकले असावे, परंतु आज आम्ही ज्या जेलबद्दल सागणार आहोत, तेथे फक्त एकच कैदी राहत आहे. होय … ऐकून जरी तुम्हाला आश्चर्य वाटले असले तरी ते खरं आहे. हे जेल गुजरात जवळील दानम दीव येथे आहे. समुद्राच्या मध्यभागी बांधलेल्या या कारागृहात एकच कैदी आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सरकारने या एकाच कैद्याला ह्या तुरुंगात का ठेवले आहे? एवढेच नव्हे तर सरकार या कैद्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करते.
तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या बेटाला एक केंद्र शासित बेट
मानले जाते. यापूर्वी या बेटावर पोर्तुगालचे राज्य होते आणि हे जेल देखील त्यांच्या काळातील आहे. 2013 मध्ये एएसआयने जेलला पर्यटनाची चालना देण्यासाठी सुरु केले. त्यावेळी कारागृहात दोन महिला कैद्यांसह एकूण सात कैदी होते. यातील चार कैद्यांना दीवपासून 100 किमी अंतरावर असलेल्या अमरेली कारागृहात नेण्यात आले. दोन कैद्यांनी आपली शिक्षा पूर्ण केली. तेव्हापासून येथे फक्त दीपक कांजी हा एकमेव कैदी शिल्लक आहे. पत्नीवर विषबाधा केल्याबद्दल त्याच्यावर दीव सत्र न्यायालयात खटला चालू आहे. दीपक साधारण तीस वर्षांचा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेल मध्ये ह्या कैद्याशिवाय कोणीही राहत नाही.

सरकारने ह्या कैद्याला जेल मध्ये खूप सुविधा दिल्या आहेत जसेकी दूरदर्शन पाहणे आणि वर्तमानपत्र वाचणे यासारख्या अनेक सुविधा दिल्या आहेत. यासह तुरुंगात कैद्याला गुजराती वृत्तपत्र वाचण्याची सोय देखील आहे. दीपकच्या पिण्याची आणि खाण्याची व्यवस्था तिथेच केली गेली आहे. दीपकला रेस्टॉरंटमधून जेवण मागवले जाते. एवढेच नाही तर या कैद्याला पहाटे दोन तास बाहेर फिरायला नेले जाते. तुम्हाला सांगू इच्छुतो कि या कैद्याला इथे यासाठी ठेवले आहे की सर्वांना समजावे की इथे जेल आहे, तरी आता सरकार या कैद्याला दुसऱ्या जेल
मध्ये नेण्याचा विचार करीत आहे.