मित्रांनो प्रत्येक राष्ट्रध्वज हा आपआपल्या राष्ट्राचा समान आणि अभिमानाचे प्रतीक असतो. या मुळेच स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन तसेच इतर देशाच्या कार्यक्रमांत राष्ट्रध्वजाचा उपयोग केला जातो. आपणही 15 आगस्ट, 26 जानेवारीच्या दिवशी राष्ट्राचा अभिमान असल्यामुळे कागदाचे आणि प्लास्टिक चे तिरंगे विकत घेतो. हाच राष्ट्रध्वज दुसऱ्या दिवशी कचरा पेटीत किव्हा रस्त्यावर फाटलेल्या अवस्थेत दिसून येतात. जे की खूप चुकीचे आहे. मित्रांनो तुम्ही तिरंगा भरपूर वेळेस पाहिला असेल, हातात ही घेतला असेल, तुम्हाला हे ही माहिती आहे की तिरंगा मध्ये तीन रंग आहे. ज्यामध्ये सर्वात पहिला केसरी रंग, मध्यात पांढरा,आणि खाली हिरवा रंग आहे. या बरोबरच मध्ये अशोक चक्र आहे. ज्या मध्ये 24 आरे आहेत.
आपल्या राष्ट्रध्वज्या विषयी एवढे तर आपल्याला माहीतच आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का…? हा आपला तिरंगा केव्हा व कोणी बनवला..? आणि आता जो आपण तिरंगा पाहत आहोत, हाच आपला प्रथम राष्ट्रध्वज आहे की या आधीही दुसरे तिरंगे बनले आहेत. गांधीजींनी 1921 मध्ये आंध्रप्रदेश मधील एक व्यक्ती ज्याचं नाव होतं Pingali Venkayya हा व्यक्ती स्वातंत्र्य आंदोलना मध्ये क्रांतिकारी होता. गांधीजींनी सांगितले ध्वज असा बनवा ज्या मध्ये संपूर्ण भारताचे चित्रण दिसले पाहिजे. त्या नंतर Pingali Venkayya यांनी संपूर्ण देशाचे झेंडे पाहून त्यांनी एक झेंडा तयार केला.
जो असा दिसत होता.

या ध्वजा मध्ये दोन रंगाच्या पट्ट्यांचा समावेश केला होता. ज्यामध्ये वरती हिरवा खाली लाल रंगाच्या पट्टीचा समावेश होता. आणि मध्ये एक चकरा दर्शविला होता. या ध्वज्यातील रंगानी देशातील धर्माचे प्रतिनिधीत्व केले होते. ज्या मध्ये लाल रंग हिंदूंचे तर हिरवा रंग मुसलमान चे प्रतिनिधित्व करत होता. नंतर काळानुसार ध्वज बदलत गेले.
1931 मध्ये असा ध्वज बनविला.

या ध्वज्या मध्ये ही सुधारणा करून 22 जुले 1947 ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली विधान सभेची एक बेठक झाली. ज्या मध्ये हा आपला तिरंगा राष्ट्रीय ध्वज मानून घोशीत केला.

आपल्या तिरंग्याची व्याख्या ही धर्मनिरपेक्षता ठेवण्यात आली. ज्यामध्ये वरील केसरी रंग देशाची शक्ती दर्शवितो. मध्ये पांधरा रंग सत्य व शांती दर्शवितो आणि हिरवा रंग भारतातील कृषी, हिरवळता दर्शवितो आणि मध्ये सम्राट अशोकाचे चक्र हे कायद्याचे चक्र म्हणून दर्शविले आहे.