मित्रांनो लागिर झालं जी मालिकेचा आता पूर्ण पणे शेवट झाला आहे. ही मालिका एवढ्या लवकर संपेल असे कोणालाही वाटलं न्हवत. झी मराठीवर जेव्हा लागीर झालं जी ही मालिका आली होती तेव्हा तिने एक नवीनच TRP तयार केला होता. म्हणजेच अतिशय लोकप्रिय ही मालिका ठरली होती. तर मित्रांनो या मालिकेने एवढ्या लवकर का निरोप घेतला ते तुम्हाला आता सांगणार आहोत. या मालिकेतील काही कलाकारांना पुरेसे मानधन मिळत न्हवते. यामुळेच मागील वर्षी हे कलाकार मालिका सोडून गेले होते.
तेव्हाच या मालिकेचा शेवट झाला होता. काही लोकांना ती मालिका तेव्हापासूनच पसंद पडत न्हवती कारण नवीन कलाकार त्यांना आवडत न्हवते. तर मित्रांनो या मालिकेचा TRP तेव्हापासून खूप कमी होऊ लागला होता. या मालिकेचा TRP खूप कमी झाल्यामुळे या मालिकेला स्पॉन्सर देखील मिळत न्हवते.

मित्रानो हेच मोठं कारण आहे या मालिकेला बंद करण्याचं. या मालिकेला पुरेसा असा TRP मिळत न्हवता. त्यामुळेच झी मराठीला या मालिके मूळे काहीच प्रॉफिट होत न्हवता. त्यामुळे या मालिकेला खूपच लवकर संपवण्याचा निर्णय झी मराठीने घेतला. तर मित्रांनो झी मराठी मालिकेचा पार्ट 2 तुम्हाला पहायला आवडेल का ? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.