आजकाल जग दिवसेंदिवस स्मार्ट आणि फास्ट होत चाललंय. प्रत्येक क्षेत्रातील कंपनी अधिकाधिक प्रगती करत आहे. ग्राहकांना आकर्षण करण्यासाठी विविध सुविधा प्रलोमभन देत आहेत.अश्या या स्पर्धेच्या युगात प्रत्येक जणांना आपल्या परीने खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि यात सर्वसामान्य व्यावसायिक पण मागे राहिले नाहीत. आता हेच बघा ना एका ठिकानाऊन दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी Ola, Uber सारख्या शेकडो पर्याय आपल्याला घर बसल्या उपलब्ध आहेत. पण या महागड्या गाड्यांची सेवा तुम्हाला एका साध्या रिक्षात मिळाली हे तुम्हाला सांगितले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. परंतु हे खरेआहे. हा अनोखा पराक्रम केलाय चेन्नई शहरातील अण्णा दुराई यांनी. लोक त्यांना त्यांच्या अमेझिंग ऑटो मुळे त्यांना ऑटो अण्णा असे ही म्हणतात. अण्णाच्या ऑटो मध्ये 8 प्रकारचे न्युज पेपर, 5 प्रकारचे मागझिन्स, टॅबलेट्स, i-pad, Wifi, Tv यांसारख्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. याच सोबत अण्णा प्रवासी ग्राहकांना प्रवास भाड्यातही सूट देतात. त्या मुळे अण्णाना देशातील सर्वात ज्यास्त ग्राहक आकर्षित करणारे ऑटो अण्णा म्हणतात. परिनामी ते कायम Social Media, वर्तमान पत्र, Tv सारख्या माध्यमांमधून झळकत असतात.
चला तर सविस्तर जाणून घेऊया अण्णा दुराई म्हणजेच ऑटो अण्णा यांच्याबद्धल. मुळचे तुमजापूर जिल्हा पेरावर्णी येतील असणारे अण्णा दुराई हे 4 वर्ष्याच्या असताना आपल्या 3 भावडासईत चेन्नई शहरामध्ये आले. अण्णा स्कूल Topout आहेत पण गेल्या अनेक वर्ष्या पासून चेन्नई IT कॉरोडोर भागात रिक्षा चालवीत आहेत. त्यांचा ऑटो रिक्षाही इतर रिक्षा प्रमाणे 6 सीट शेअरिंग ऑटो आहे. परंतु अण्णाच्या ऑटो मध्ये एवढ्या सुविदा मिळतात की तेवढ्या सुविदा ऑनलाईन Cap मध्ये सुद्धा मिळत नसतील. अण्णाचा ऑटो आजच्या प्रमाणे पूर्वी नव्हता. सुरवातीला इतरां प्रमाणे ग्राहकांना ते एका ठिकानाऊन दुसऱ्या ठिकाणी सोडायचे. परंतु आण्णा ना त्यात आनंद मिळत नव्हता.

ग्राहक देवो भव या ओळी प्रमाणे ग्राहक हे आपले देव आहेत आणि आपण त्यांच्या साठी इतरांपेक्ष्या काही वेगळं करायला हवं ज्यातून ते संतुष्ट आणि आनंदी होतील अस विचार कायम आमच्या मनात यायचा आणि केवळ हा विचारच केला नाही तर त्याची ही अफलातून कल्पना आमलात सुद्धा आणली. सुरवातीला अण्णा फक्त वर्तमान पत्र आणि मॅगझीन ऑटो मध्ये ठेवायचे. पुढे ग्राहकांचा उत्कृष्ठ प्रतिसाद पाहता अण्णा ऑटो मधील सुविधा मध्ये भर घालत गेले. जिथे महिन्या काठी 15 हजार अण्णा ना मिळाचे त्यातील 7 हजार ऑटो मधील सुविधा वाढवण्यासाठी वापरायचे. अण्णा कायम ग्राहकांना काय हवं काय नको याचा विचार करतात. आजच्या काळात इंटरनेट ची गरज लक्ष्यात घेता अण्णा च्या ऑटो मध्ये wifi आहे. मनोरंजनासाठी i-pad, टॅबलेट,TV, आणि निरनिराळे मागझिन्स आहेत पहाटे घाई घाई ऑफिस ला किव्हा स्कूल कॉलेज ला जाणाऱ्या प्रवासांना वर्तमापत्र वाचण्यासाठी 8 भाषेतील वर्तमान पत्र उपलब्ध आहेत.
अण्णाना Hand Cash देण्याची गरज नाही कारण अण्णानी ग्राहकांसाठी ऑनलाईन कॅश ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अण्णा ग्राहकांना प्रवास भाड्यात सुटही देतात. मनोरंजनासाठी ग्राहकांना प्रश्नं विचारतात आणि बरोबर उत्तर देणाऱ्यास अण्णा हजारोंच्या बक्षिसे ही देतात. अण्णा ना शिक्षणाची आवड असल्याने अण्णा शिक्षकांना व दवाखान्यात सर स्टाफ ना मोफत प्रवास देतात. खरच या बाबतीत अण्णाच करावं तितकं कोतुक कमीच आहे.