पंचतारांकित अर्थात महागडी फाईव्ह स्टार हॉटेल्स मधील दोन केळ्याची किंमत पाहिल्यावर डोळे पांढरे होतील…

पंचतारांकित हॉटेल्स म्हणजेच 5 स्टार हॉटेल मधील सेवा सर्वानाच परवडतात असे नाही.अत्यंत सामान्य परिस्तिथीत मध्यम वर्गात जन्म घेतलेल्या सर्वानाच महागड्या 5 स्टार हॉटेल आणि त्यात मिळणाऱ्या सेवांच कायमच आकर्षण राहिले आहे.मात्र 5 स्टार मध्ये मिळणाऱ्या सुविधा साठी लावलेली रक्कम पाहून तुमचे डोळे पांढरे होतील.अर्थात काही श्रीमंत लोक गरीब लोकांकडे कांदे,बटाटे,घेताना 2-2 रुपयांसाठी घासाघीस करतात. मात्र हेच लोक 5 स्टार हॉटेल मध्ये जातात त्यावेळी त्यांची लूट होते यावर ते श्रीमंतीचे स्टेटस म्हणून काना डोळा करतात.

मात्र यावर अभिनेता राहुल बोस सर्वांपेक्ष्या वेगळा ठरलाय. राहुल बोस चंदीगड मधील JW Marriott या पंचतारांकिती हॉटेल मध्ये थांबला होता. या हॉटेल मध्ये सकाळच्या वेळेत workout करत असताना त्याने नाष्ट्या साठी दोन केळी मागवली होती. विशेष म्हणजे या दोन केळ्यांसाठी हॉटेल ने काढलेलं बिल पाहून राहुल चक्रावून गेला. या दोन केळ्यांसाठी हॉटेल ने चक्क 442 रुपयांचं बिल दिले. राहुल ने ट्विटर च्या माध्यमातून ही माहिती शेअर केली आहे. राहुल म्हणतोय यावर विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला बिल पाहावं लागेल. कोण म्हणतं की फळ आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक नाहीत. JW Marriott चंदीगड मधील लोकांना एकदा विचारा असा कॅपशन राहुल ने या विडिओ ला दिला आहे.

दरम्यान राहुल चा हा विडिओ चांगलाच viral झाला आहे. अनेकांनी पंचतारांकित हॉटेल मध्ये आकारण्यात येणाऱ्या बिल वर बोट ठेवले आहे. त्या सोबतच असल्या हॉटेल वर टीका सुद्धा केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.