अंपायर बिली बोडेन यांची ही अंपायरिंग करण्याची स्टाईल नाही त्यामागे त्यांना झालेला एक आजार आहे…

बिली बोडेन क्रिकेट विश्वातील अंपायर चे सर्वात मोठे नाव. क्रिकेट पाहणाऱ्याला एखाद्याला बिली बोडेन यांचं नाव माहीत नाही असं होऊच शकत नाही. एखाद्या वेळेस match मध्ये काय झाले हे लक्षात राहणार नाही. पण बिली बोडेन यांनी केलेली कॉमेडी अंपायरिंग कोणीच विसरू शकत नाही. मैदानात आचरट प्रमाणे हात पाय हलवून सर्वानाच हलवत असतो. त्याचे असे अनेक किस्से आहेत. ग्लेन मेगरा याने जेव्हा जाणीवपूर्वक डेड बॉल टाकला तेव्हा बिले ने त्याला फारच नाट्यमक रुपात रेड कार्ड दाखवले. मैदानात खूपच हास्य उडाला. बिलीला तर अनेकदा बॉल लागलाय. बॉल पण त्याचाच पाठलाग करत असतो. बिली ला बॉल स्वतःच्या दिशेने येताना दिसला तर गमतीशीर पणे तो चुकवतो. जर बसलाच त्याच्या चेहऱ्यावरील भाव कॅमेरा टिपतोच.

बिलीचा जन्म हा न्यूझीलेंडचा, लहान पणापासूनच त्याला खेळायचा नाद होता. वयाच्या 20 व्या वर्षी तो न्यूझीलेंडच्या टीम मध्ये खेळू लागला. तो एक चांगला फास्ट बॉलर होता. पण पुढे त्याला एक आजार झाला आणि त्याला उमेदीच्या कळातच क्रिकेट ला रामराम ठोकावा लागला. पुढे तो अंपायर झाला. पण इथे त्याच्यामध्ये आजार येत होता. या वेळेस मात्र या दुखण्यावर त्याने तोडगा काढला. किस्सा असा आहे की बिली बोडेन याला झालेला तो आजार म्हणजेच humetain artarity म्हणजेच सांदेवात. बिली ला सांदेवादाणे ग्रासले होते.आणि त्याला स्नायूंच्या हालचाली करणे अवघड जाऊ लागले. त्यामुळे त्याला इतक्या तरुण वयात क्रिकेट सोडावे लागले. पुढे बिली अंपायर झाला. तिथे सुद्धा त्याला सांदेवातीच त्रास होऊ लागला. त्याला पटकन हात वरती करता येत नाहीत. एकाच ठिकाणी स्तब्ध उभे राहिले की त्याला परत हालचाल करणे कठीण जाते. अंग दुखू लागले की त्याला थोड्या थोड्या वेळाने स्ट्रेचिंग करण्याचे डॉक्टरांचे सल्ले आहेत.

आता बिली परत त्याचे काम सोडू शकत नव्हता. या वेळेस त्याने लढायचे ठरविले. त्याने त्याच्याच अंपायरिग मध्ये कराव्या लागणाऱ्या हाचालीन मध्ये काही कल्पक बदल केले. यातूनच बिली बोडेन ही एक नवीन अंपायरिग स्टाईल उदयास आली. जी अंपायर म्हणून प्रभावी होतीच पण त्यात एक मनोरंजन मूल्य ही होते. बिलीच्या हाताची बोटे लगेच सरळ होत नाहीत. म्हणून कोणाला आऊट देताना त्याचे बोट वाकडेच असते. सिक्स मारल्यावर त्याचा हात पटकन वर होत नाहीत. म्हणून तो एक विशिष्ट पद्धतीने हात वरती करतो. या वेळे ही त्याची बोटे आकड्यांसारखी वाकडीच असतात. त्याला डॉक्टरांनी स्ट्रेचिंग करायला जे सांगितले आहे. ते तो खेळ चालू असतानाच करतो. जेव्हा फलंदाज चोकार मारतो ठेव्हा बिली side स्ट्रेचिंग करून घेतो. तो दोन तीन वेळा हात हलून उजव्या बाजूला झुकतो, तेव्हा त्याची स्ट्रेचिंग ही होते आणि अंपारिंग पण. जेव्हा एकदा फलंदाज बाय च्या रन मिळवतो तेव्हा बिली गुडगा वर करून lower बॉडी ची ही स्ट्रेचिंग करून घेतो. परीक्षकांना ती गम्मत वाटते पण बिली आजारावर काढलेला त्याचा तो उपायच आहे.

One Comment on “अंपायर बिली बोडेन यांची ही अंपायरिंग करण्याची स्टाईल नाही त्यामागे त्यांना झालेला एक आजार आहे…”

Leave a Reply

Your email address will not be published.