धावत्या गाड्यांच्या पाठीमागे कुत्रे का धावतात ? याच्या मागे आहे हे शास्त्रीय कारण, अगदी पुरातन काळापासून कुत्रा हा माणसाचा अतिशय विश्वासू प्राणी राहिला आहे. आपल्या इतिहासात डोकावून पाहिले तर तसे स्पष्ठ उलेख आपल्याला पाहायला मिळतात. आणि आजच्या काळात तर प्रत्येक दुसऱ्या घरात एक तरी कुत्रा पाळलेला दिसतो. कुणी हवशेने कुत्रा पाळतात तर कुणी घरच्या संवरक्षनासाठी तर इतर संवरक्षनासाठी कुत्री पाळतात. अगदी सैन्यात ही अगदी मोलाचे स्थान आहे. एकंदरीत हा प्राणी आज सर्वत्र पाहायला मिळतो. काहींना तो आवडतो तर काहींना त्याची खूप भीती वाटते. काही लोक तर कुत्र्याचा खूप तिरस्कार करतात. विशेषतः त्या भटक्या कुत्रांचा जे कायम सायकल,मोटारसायकल, कार यांच्या विनाकारण मागे लागतात.
तुम्हाला याचा एकदातरी अनुभव आला असेलच पण तुम्ही विच्यार केलाय का? की ही कुत्री असे का करत असतील. याच्या मागे काही शास्त्रीय कारणे आहे का तीच आपण आज पाहणार आहोत. पाहायला गेले तर कुत्री मागे लागण्याचे अनेक कारणे सांगितली जातात. प्रत्येक जणे आपल्या अभ्यासाने अनुभवाने तर्क-वितर्क लावतो. पण या सगळ्या मधील एक कारण ठळक आणि योग्य वाटत,कुत्रा हा प्राणी ज्या ठिकाणी ज्या परिसरात जन्माला येतो, जगतो अथवा लहानाचा मोठा होतो त्या भागात त्याची प्रत्येक गोष्ट ओळखीची असते. त्या भागात एखादी नवीन व्यक्ती किव्हा गाडी निदर्शनास आली की त्यांना असुरक्षित वाटू लागतं.

इमानदारी जन्मताच गुण अंगी असल्यामुळे तो ज्या परिसरात राहतो त्या लोकांच्या वरती काही संकट येऊ नये या काळजीने कुत्रे वाहनांच्या मागे लागतात. त्यानंतर या मागे असे ही एक कारण सांगितले जाते, कुत्री ही आपला परिसर ठरून घेतात. त्यांच्या भागात इतर कोणताही कुत्रा आलेला त्यांना आवडत नाही. ठरावीक परिसरावर त्यांचाच हक्क आहे त्या मिळे ते गाडीच्या टायरीवर,भिंतींवर ठिकठिकाणी लघुशंका करत असतात. याच कुत्रांना आपण घेऊन एखाद्या नवीन ठिकाणी जातो ठेव्हा एखादा नवीन कुत्रा आला आहे याची जाणीव होते श्वास शक्ती तीव्र असल्यामुळे ते लघुशंका च्या ठिकाणी श्वास घेऊन मागे लागतात. हा त्यांच्या दैनंदिन जीवनातील ठरवलेला भाग असतो.