मुघल सरदार ज्यांनी मुघलशाही विरोधात शिवाजी महाराजांसाठी कामे केली

इतिहासात औरंगजेब बादशहा हा एक क्रूर राज्यकर्ता म्हणून नोंद आहे. हा एक संशोधनाचा विषय आहे. पण औरंगजेब ने आपल्या सख्या मोठ्या भावाला मृत्युदंडाची शिक्षा दिली. वडिलांना नजरकैद केले व स्वतः राजगादी वर विराजमान झाला व ४९ वर्ष राज्य केले. आलमगीर औरंगजेब हा आपल्या काळातील कुशल सेनापती, युद्धनीतीतज्ञ,आणि मुत्सद्दी असा राजा होता. जेंव्हा तो आपल्या लक्षावधींच्या फौजा घेऊन दक्षिणेत उतरला त्या वेळी त्या संघर्षाचे स्वरूप धार्मिक नव्हते. औरंगजेबच्या सेनेत लाखांनी मोजावे एवढे मोठे प्रमाण हिंदू सैनिकांचे होते. हा लढा कधीच दोन धर्मांमध्ये नव्हता,औरंगजेब हा फक्त मराठयांचे राज्य नव्हे तर आदिलशाह, निजामशहा हे मुस्लिम राज्य नष्ट करण्यासाठी आला होता. त्याच बरोबर आदिलशाह, कुतुबशहा यांच्या सेनेत सुद्धा कितीतरी मराठे सरदार होते. तसेच शिवाजीराजेंची भूमिका फक्त मराठयांचे राज्य नाही तर हिंदवी स्वराज्याची होती, त्यावेळी स्वराज्य हे कर्नाटक,तामिळनाडू पर्यंत पसरलेले होते. शिवाजी महाराज हिंदू राज्य नव्हे तर हिंदवी स्वराज्य स्थापन करायचे होते आणि हीच “श्रीं ” ची म्हणजे ईश्वराची इच्छा आहे असे ते मानत असे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यमधे सुद्धा मुघल सरदार होते. जे प्रामाणिक पनाने महाराजांची सेवा करत होते. काय होते असे शिवाजी महाराजांच्या कडे जे मुघल सरदारांना मुघल साम्राज्या तुन मिळत नव्हते. होय मराठा साम्राज्य उभा करण्यासाठी व हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी मुघल सरदार ही होते. चला तर पाहुयात मराठा स्वराज्य उभा करण्यासाठी कोणत्या मुघल सरदारांनी मुघलांच्या विरुद्ध लढाई केली. विज्यापुरच्या सरदारच्या तानाशाहिला कंटाळून 700 मुघल सरदार व शिपाई शिवाजी महाराज्यांच्या सैन्यमधे भर्ती झाले. या मुघल सरदारांची मराठा सैन्यच्या प्रशिक्षणासाठी नियुक्ति करण्यात आली ते मराठा साम्राज्याला तोफ खाना, नवदल सीमा अश्या महत्वाच्या शिकवनी देत असत तसेच, मुघलांच्या सैन्यचे दावपेच कसे मोडावे हे सांगत असत.

या मुघलाकडून शिकलेले दावपेच,गनिमी कावा मराठा सैन्यने मुघलांच्या लढाई वेळी वापरला. तसेच नाही तर मुघल सेनिकानी लढाईत प्राणाची आहुती सुद्धा दिली. शिवाजी महाराज्यांचे साम्राज्य पश्चिमेला वाढत होते. तसेच वाढत्या साम्राज्या सोबत धोकाही वाढत होता. समुद्री हल्ले होत होते व त्यावर लवकरात लवकर मार्ग काढावा लागणार होता. तेंव्हा स्वता शिवाजी महाराजांनी समुद्री हल्ले थांबवन्यासाठी सशक्त सेना उभी केली होती. व मुघल सेनेचा दवलत खान याची निवड केली होती. दवलत खानने मुघल सेने ला व मच्छीमार्याना सोबत घेऊन त्याच्या नाविक स्थळाचे संव्रक्षण केले. छत्रपति शिवाजी महाराज्यांच्या तीन अंगरक्षकांपैकी एक मुघल सरदार सिद्धि इब्राहिम होता. जेव्हा शिवाजी महाराजांनी अफजल खान सोबत तह केला, तेव्हा सिद्धि इब्राहिम तिथे महाराज्यांच्या सेवेसाठी उभा होता. तर असे होते काही मुघल सरदार जे मुघल असूनही मुघलांच्या विरुद्ध लढले. सलाम त्या सरदारांना योग्य वेळी सत्याची निवड करुण असत्या विरुद्ध लढाई केली. हे शिवाजी महाराजांचा कर्तुत्वच होत जे जाती धर्मात भेदभाव न करता सर्वाना बरोबर घेऊन स्वराज्याचा गाड़ा हाक़त होते.

Leave a Reply

Your email address will not be published.